मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं यंदाच्या दिवाळीतील लाडकी लेक राहा बरोबरचा काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांना उधाण आलं आहे. यामध्ये त्यांच्यातील अतुट प्रेमाचं नातं आणि परंपरा यांचं परिपूर्ण मिश्रण दिसून येतंय. त्यामुळे चाहत्यांसाठी हा फोटो एक संस्मरणीय प्रसंग बनला आहे.
इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये आलियाने "दिवे, प्रेम आणि मोलाचे क्षण. दिवाळीच्या शुभेच्छा" या कॅप्शनसह दिवाळीचं वर्णन केलंय. यामध्ये राहा, आलिया यांच्या बरोबर रणबीरनं सोनेरी रंगाचा मॅचिंग ड्रेस परिधान केला आहे. दिव्यासह सजलेल्या आरतीत फुलांसह आलियानं लेकीसाठी आपलं प्रेमही अर्पण केलंय. चिमुकल्या राहासाठी दीर्घकाळ स्मरणात राहील असाच हा फोटो आहे.
आलियानं दुसऱ्या एका फोटोत तिची बहीण, शाहीन आणि आई, सोनी रझदान हिच्याबरोबरची प्रेमळ मिठीही शेअर केली आहे. यात त्यांच्यातील कौटुंबिक बंधन सुंदरपणे स्पष्ट झालेलं दिसतंय. एका फोटोत राहा तिची आजी नीतू कपूर यांच्यासह पूजेत सहभागी झाल्याचं दिसतंय. कपूर फॅमिलीमध्ये दिवाळी सणाचा उत्सव दर्शवणारे काही फोटोही यामध्ये आहेत. सुरेख रांगोळी, दिव्यांची रांग, फुलांची आरास यामुळे घरातील प्रत्येक कोपरा उत्सवासाठी सजवल्याचं दिसत आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा कपूर आकर्षक लूकमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत आहे. दोघांनीही बराच काळ तिचा मीडियासमोर येऊ दिला नव्हता. एक वर्षानंतर ख्रिसमस साजरा करातना राहाचा लूक सर्वांसमोर आला आणि तिच्या सुंदर डोळ्यांनी सर्वांची मनं जिंकली होती. यानंतर राहाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
कामाच्या आघाडीवर आलिया भट्ट अलीकडेच वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' मध्ये दिसली आहे. यशराज फिल्मसच्या गुप्तहेर मालिकेतील नव्या कोऱ्या 'अल्फा' या फ्रँचाईजमध्ये शर्वरी वाघबरोबर दिसणार आहे. तर रणबीर कपूर संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'लव्ह अँड वॉर' या भव्य चित्रपटासाठी तयारी करत आहे. यामध्ये तो आलिया आणि विकी कौशल यांच्याबरोबर काम करत आहे.