ETV Bharat / entertainment

राहानंतर आलिया भट्ट करतेय दुसऱ्या बाळाची अपेक्षा, भविष्यातील योजनांबद्दल केला खुलासा - ALIA BHATT PLANNING FOR SECOND BABY

आलिया भट्टला राहा नंतर आणखी दुसरं बाळ पाहिजे आहे. तिनं एका संवादादरम्यान तिच्या भविष्यातील योजनांबद्दल उघडपणे सांगितलंय.

Alia Bhatt
आलिया भट्ट (आलिया भट्ट- रणबीर कपूर (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 12, 2024, 1:50 PM IST

Updated : Oct 12, 2024, 2:48 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टनं अलीकडेच तिच्या भविष्यातील योजनांचा खुलासा केलाय. तिला राहानंतर आणखी मुले हवी असल्याचं तिनं एका संवादादरम्यान सांगितलंय. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नोव्हेंबर 2022 मध्ये आई-वडील झालेत आणि त्यांनी राहाचं स्वागत केलं. अलीकडेच एका पत्रकार परिषदेत आलियाला विचारण्यात आलं की, ती तिच्या भविष्याबद्दल काय प्लॅनिंग करीत आहे. यानंतर तिनं आपल्या भविष्यातील काही योजना उघड केल्यात. राहाविषयी बोलताना आलियानं बऱ्याचं सुंदर गोष्टी तिच्या कुटुंबाबद्दल सांगितल्यात.

आलिया भट्टची भविष्यातील योजना : यात तिनं म्हटलं की, 'मला वाटतं, 'माझ्यासाठी 'स्टुडंट ऑफ द इयर' हा सर्वात अप्रतिम चित्रपट आहे, जो मुलं पाहू शकतात आणि हा माझा पहिला चित्रपट आहे. त्या चित्रपटात माझा फारसा अभिनय नसला तरी, यात चांगली गाणी आहेत आणि राहा हे नक्कीच एन्जॉय करेल, असे मला वाटते. याशिवाय रणबीरचा 'बर्फी' चित्रपटदेखील चांगली निवड असेल.' यानंतर आलियाला तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितलं की,'मला आशा आहे की, मी अनेक चित्रपट करेन, निर्माता म्हणून चित्रपट करायला आवडेलं.अधिक मुले व्हावीत, खूप प्रवास करवा. निरोगी आणि साधे जीवन जगावं असे मला वाटते.' आलिया मुलाच्या मुद्द्यावर बोलत असताना, ती भविष्यात मुलाला जन्म देण्याचा विचार करत असल्याचं दिसून यावेळी आलं.

वर्कफ्रंट : 'जिगरा' चित्रपटाचं केलं चाहत्यांनी कौतुक : आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिचा 11 ऑक्टोबर रोजी 'जिगरा' चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. आलियानं करणबरोबर या चित्रपटाची निर्मिती केली आहे. वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलियाशिवाय वेदांग रैना मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटामध्ये तो आलियाच्या भावाची भूमिका साकारताना दिसत आहे. 'जिगरा' चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचे कौतुक सध्या सोशल मीडियावर केले जात आहे. आलिया ही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही ती व्यग्र आहे. अलीकडेच तिनं हैदराबादमध्ये समांथा रुथ प्रभू आणि राणा दग्गुबातीबरोबर चित्रपटाचे प्रमोशन केले होते.

हेही वाचा :

  1. "प्रेमाच्या विशाल मिठीत बिलगली कपूर फॅमिली" : रणबीरच्या वाढदिवशी आलियानं शेअर केले कौटुंबिक क्षण - Ranbir Kapoor birthday
  2. आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Alia bhatt Vedang Raina
  3. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची मुलगी राहा झाली आजी नीतू कपूरला पाहून सरप्राईज, व्हिडिओ व्हायरल - raha kapoor

Last Updated : Oct 12, 2024, 2:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.