मुंबई - Alia Bhatt and Vicky Kaushal : अलीकडेच मेट गाला 2024 मध्ये तिच्या पारंपारिक लूकनं प्रशंसा मिळवणारी आलिया भट्ट पहाटे मुंबई विमानतळावर दिसली. तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आलिया व्यतिरिक्त विकी कौशल देखील विमानतळावर स्पॉट झाला. आता दोघेही सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आले आहेत. आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचा विमानतळावरचा हा व्हिडिओ अनेकांना आवडला आहे. दोन्ही स्टार्स कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी फ्रान्सला रवाना झाले आहेत. सध्या या याबाबत आलिया आणि विकीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आलिया भट्ट आणि विकी कौशलचा व्हिडिओ व्हायरल : पापाराझीनं आलिया भट्ट आणि विकी कौशल यांचा विमानतळावरचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. व्हिडिओमध्ये आलिया पांढऱ्या रंगाच्या टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये दिसत आहे. यावर तिनं सुंदर सनग्लास लावला आहे. तिनं तिचे केस पूर्णपणे बांधले असून कमीतकमी मेकअप आणि व्हाईट स्नीकर्ससह तिचा लूक पूर्ण केला. याशिवाय तिच्या ब्रँडेड बॅगवर अनेकांचे लक्ष जात आहे. विकी कौशलच्या लूकबद्दल सांगायचं झालं तर त्यानं बेज रंगाचा शर्ट आणि पॅन्ट घातला असून यावर टोपी आणि तपकिरी रंगाचा सनग्लासेस लावला आहे. त्याचा हा लूक खूप सुंदर दिसत आहे.
आलिया भट्ट आणि विकी कौशलचं वर्कफ्रंट : आलिया भट्ट आता 'जिगरा'मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे संजय लीला भन्साळीचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपटही आहे. यामध्ये ती पुन्हा एकदा रणबीर कपूरबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय 'लव्ह अँड वॉर'मध्ये विकी कौशलही आहे. तसेच आलियाकडे फरहान अख्तरचा 'जी ले जरा' हा आहे. यामध्ये ती कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्राबरोबर दिसणार आहे. 'मधुबाला', 'इन्शाअल्लाह' आणि 'तख्त' या चित्रपटामध्येही ती झळकेल. दुसरीकडे विकी कौशलबद्दल बोलायचं झालं तर तो 'बॅड न्यूज', 'लुका चुप्पी 2' आणि 'छावा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :