ETV Bharat / entertainment

अली फजल साऊथ चित्रपटसृष्टीत करणार पदार्पण, कमल हासन स्टारर 'ठग लाइफ'मध्ये झाली एंट्री - ali fazal - ALI FAZAL

Ali Fazal Thug Life : कमल हासन अभिनीत 'ठग लाइफ' चित्रपटामुळे अली फजल चर्चेत आला आहे. त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचा साऊथ फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा मार्ग मोकळा झाल्यानं चाहत्यांना आनंद झाला आहे.

Ali Fazal Thug Life
अली फजल ठग लाइफ (अली फजल- कमल हासन(@alifazal9/@ikamalhaasan Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 4:03 PM IST

मुंबई - Ali Fazal Thug Life : अभिनेता अली फजल मणिरत्नमच्या 'ठग लाइफ' या तमिळ चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन कमल हासन आणि मणिरत्नम करत आहेत. याशिवाय कमल हासन हे या चित्रपटात कामही करणार आहे. 'ठग लाइफ' चित्रपटामध्ये सिलांबरसन उर्फ सिम्बू, त्रिशा कृष्णन, नस्सर, जोजू जॉर्ज, अशोक सेल्वन आणि ऐश्वर्या लक्ष्मी हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान अली फजलनं त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "मणी सरांच्या 'ठग लाइफ'च्या व्हिजनचा भाग होण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी फक्त आशा करू शकतो की मी या चित्रपटात काही चांगलं करेल. कमल हासन सरांबरोबर काम करणं माझ्यासाठी सन्मानची गोष्ट आहे. यासाठी मी खूप आभारी आहे, माझ्यावर ही भूमिका सोपवल्याबद्दल मी मणी सरांचे आभार मानतो."

'ठग लाइफ'मध्ये अली फजलची एंट्री : याशिवाय त्यानं पुढं लिहलं, "माझी भूमिका पडद्यावर जिवंत आणण्यासाठी मी खूप उत्सुक आहे."दरम्यान 'ठग लाइफ' या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट बऱ्याचं दिवसांपासून चर्चेत आहे. 'ठग लाइफ' हा तमिळ-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी मणिरत्नम आणि कमल हासन यांनी लिहिली आहे. राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मूव्हीज या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. 'ठग लाइफ' चित्रपटामध्ये कमल हासन यांची प्रमुख भूमिका असणार आहे. याआधी या चित्रपटामधील एक पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं, ही पोस्ट चाहत्यांना खूप आवडलाच्या दिसलं.

'ठग लाइफ' चित्रपटाबद्दल : या पोस्टरमध्ये कमल हासननं आपला चेहरा हा एका कपड्याद्वारे झाकला आहे. कमल हासन यांचा हा मुख्य अभिनेता म्हणून 234 वा चित्रपट आहे. या चित्रपटाचं सध्या शूटिंग सुरू आहे. 'ठग लाइफ' या चित्रपटाला ए. आर . रहमान संगीत देत आहे. या चित्रपटाकडून कमल हासन यांना खूप अपेक्षा आहेत. दरम्यान अली फजलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'मेट्रो इन दिनों'मध्ये सारा अली खान आणि आदित्य रॉय कपूरबरोबर दिसणार आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग बसू करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'रामायण'साठी रणबीर कपूरची नवीन हेअरकट, फोटो व्हायरल पहा - ranbir kapoor new haircut
  2. सलमान स्टारर 'सिकंदर'च्या स्टारकास्टमध्ये रश्मिका मंदान्ना सामील, कृतज्ञतेची भावना केली व्यक्त - Rashmika Mandanna
  3. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचा व्हिडिओ व्हायरल, कॅमेरा बघताच केलं 'हे' कृत्य - Deepika Padukone and Ranveer Singh

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.