ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारच्या मार्शल आर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांना आयकर विभागात मिळाली नोकरी - Akshay Kumar

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 5:04 PM IST

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या मार्शल आर्ट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या काही विद्यार्थ्यांना आयकर विभागात नोकरी मिळाली आहे. अक्षय कुमारनं या सर्व विद्यार्थ्यांचे फोटो त्यांच्या नियुक्ती पत्रांसह शेअर केले आहेत.

Akshay Kumar
अक्षय कुमार (अक्षय कुमार (IMAGE- IANS))

मुंबई Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार आज 26 जूनला खूप आनंदात आहे. अक्षय कुमार आज आनंदी आहे कारण त्याचा नवीन चित्रपट येत आहे म्हणून नाही तर, तो खुश आहे कारण आज त्याला एक चांगली बातमी मिळाली आहे. अक्षय कुमारनं ही आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अक्षय हा मार्शल आर्ट ट्रेनिंग स्कूल चालवतो हे सर्व चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. दरम्यान त्यानं त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्याच्या प्रशिक्षण केंद्रातून मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कोट्यातून आयकर विभागात नोकऱ्या मिळाल्या आहेत.

अक्षय कुमारनं केला आनंद व्यक्त: अक्षय कुमारनं नोकरी मिळालेल्या या सर्व विद्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सर्वांच्या हातात नियुक्तीपत्रे आहेत. अक्षयनं ही आनंदाची बातमी शेअर करताना लिहिलं, "मी आज खूप आनंदी आहे, माझी 'मार्शल आर्ट्स अकादमी' बऱ्याच दिवसांपासून प्रशिक्षण देत आहे. माझ्या 'मार्शल आर्ट्स अकादमी'ला स्पोर्ट्स कोटा अंतर्गत नियुक्तीसाठी मान्यता मिळाली आहे. मुंबईच्या आयकर विभागाकडून नियुक्तीपत्रे मिळालेल्या विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले आहेत. या यशानं मी खूप भावूक झालो आणि खूप अभिमान वाटत आहे."

अक्षय कुमार बनायचं होत मार्शल आर्ट टीचर : पीएम मोदींबरोबरच्या चर्चेदरम्यान अक्षय कुमारनं खुलासा केला होता की त्याला अभिनेता बनायचे नव्हते. यादरम्यान त्यानं पुढं सांगितलं होत की, "मी अभिनेता होईन असे कधीच वाटलं नव्हतं, मला नेहमीच मार्शल आर्ट टीचर व्हायचं होतं. पण मी चित्रपटसृष्टीत उतरलो. अक्षयनं त्याच्या सुरुवातीच्या फिल्मी करिअरमध्ये ॲक्शन फिल्म्स केल्यामुळं त्याला ॲक्शन कुमार आणि खिलाडी कुमार अशी नावे मिळाली. अक्षय कुमारला मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट मिळाला आहे. याशिवाय तो मुए थाई देखील शिकला आहे. दरम्यान अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात ॲक्शन मोडमध्ये दिसला होता. आता त्याचा 12 जुलै रोजी 'सरफिरा' चित्रपट रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे.

हेही वाचा :

  1. मलायका अरोरानं टाळली अर्जुन कपूरच्या वाढदिवसाची पार्टी, विभक्त होण्याच्या अफवा नसून सत्य? - Malaika Arora and ARJUN KAPOOR
  2. 'कल्की 2898 एडी'मधून 'सुप्रीम यास्किन'च्या रूपात कमल हासनचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज - Kamal Haasan first look poster
  3. 'लाईफ लाईन'मध्ये २ ऑगस्टला रंगणार अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्यात पराकोटीचा संघर्ष - Marathi movie Life Line

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.