ETV Bharat / entertainment

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट कधी प्रदर्शित होईल?, जाणून घ्या तारीख... - akshay kumar - AKSHAY KUMAR

Akshay Kumar Birthday: अक्षय कुमार आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष दिवशी त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेऊया...

Akshay Kumar Birthday
अक्षय कुमारचा वाढदिवस ((Movie Posters))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 9, 2024, 3:53 PM IST

मुंबई - Akshay Kumar Birthday: खिलाडी अक्षय कुमार हा आज 9 सप्टेंबर रोजी आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. अक्षयनं 'भूत बंगला' या नवीन चित्रपटाची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना सुंदर भेट दिली आहे. या चित्रपटातून अक्षय पुन्हा एकदा हॉरर कॉमेडीमध्ये प्रवेश करणार आहे. अक्षय कुमारबरोबर 'भूल भुलैया' हा हिट चित्रपट बनवणारे दिग्दर्शक प्रियदर्शन हे 'भूत बंगला'चं दिग्दर्शन करणार आहे. अनेक फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर अक्षय हा 'भूत बंगला' या चित्रपटातून पुन्हा बॉलिवूडमध्ये हिट देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान अक्षयच्य 'कन्नपा' या साऊथ चित्रपटातील पोस्टर आज रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये अक्षयची बाइसेप्स दाखविण्यात आली आहे. आता या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर कूप चर्चा होताना दिसत आहे. अक्षयचा अनेक दिवसांपासून एकही हिट चित्रपट आलेला नाही. त्याचे गेल्या दोन वर्षांत 8 पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट झाले आहेत. 'भूत बंगला' व्यतिरिक्त अक्षय कुमार कुठल्या चित्रपटात दिसणार याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अक्षय कुमारचे फ्लॉप चित्रपट : नुकताच अक्षय कुमारचा कॉमेडी ड्रामा चित्रपट 'खेल-खेल में' रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. 'खेल-खेल में' चित्रपटाबरोबर श्रद्धा कपूर आणि राजकुमार स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' रिलीज झाला होता. त्यामुळे 'खेल-खेल में'च्या बॉक्स ऑफिस कमाईवर परिणाम झाला. 15 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2', 'खेल-खेल में' व्यतिरिक्त, जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ स्टारर ॲक्शन ड्रामा चित्रपट 'वेदा' देखील प्रदर्शित झाला होता. कोविड 19 नंतर अक्षय कुमारनं 'सरफिरा', 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'मिशन रानीगंज', 'सेल्फी', 'राम सेतू', 'कटपुतली', 'रक्षाबंधन', 'सम्राट पृथ्वीराज', 'बच्चन पांडे' आणि 'अतरंगी रे' या चित्रपटात काम केलं, त्याचे हे चित्रपट फ्लॉप ठरले. दरम्यान 'खेल-खेल में' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अक्षय कुमारनं त्याच्या फ्लॉप चित्रपटांबद्दल बोलताना म्हटलं होतं, "जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत चित्रपट करत राहीन."

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

'भूत बंगला' - 2025

'स्काय फोर्स' - 2024

'हेरा फेरी 3' - 2024

'जॉली एलएलबी 3' 2025

'राउडी राठोड 2' 8 जानेवारी 2025

'सिंघम अगेन' ऑगस्ट - 31 ऑक्टोबर 2024

'कन्नपा' - ( साऊथ चित्रपट) 10 ऑक्टोबर 2024

'वेलकम 3: टू द जंगल' - 20 डिसेंबर 2024

'हाऊसफुल 5' - 6 जानेवारी 2025

'धुम 4' - 31 ऑक्टोबर 2026

हेही वाचा :

  1. अक्षय कुमारनं 14 वर्षांनंतर प्रियदर्शनबरोबर 'भूत बंगला'ची केली घोषणा, फर्स्ट लुक रिलीज - Akshay Kumar
  2. अक्षय कुमारचा 'हा' चित्रपट 'स्त्री 2'ला देणार टक्कर, वाढदिवसानिमित्त करणार मोठी घोषणा - Akshay Kumar
  3. प्रियदर्शनबरोबर अक्षय कुमार त्याच्या वाढदिवशी हॉरर कॉमेडी चित्रपटाची करणार घोषणा - Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.