ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि राधिका मदन स्टारर आगामी चित्रपट 'सरफिरा'मधील दुसरं गाणं रिलीज - AKSHAY KUMAR AND RADHIKA MADAN

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 3:32 PM IST

Akshay kumar 'Khudaya' out : अक्षय कुमार आणि राधिका मदन अभिनीत 'सरफिरा'मधील दुसरं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं आहे.

Akshay kumar 'Khudaya' out
अक्षय कुमार खुदया गाणं रिलीज (अक्षय कुमार - instagram)

मुंबई - Akshay kumar 'Khudaya' out : अक्षय कुमार हा सध्या 'सिरफिरा' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अक्षयला सामाजिक विषयांवर चित्रपट बनवायला आवडतात. या चित्रपटाचं काही दिवसापूर्वी पहिलं गाणं रिलीज झालं होत. आज 27 जून रोजी या चित्रपटामधील दुसरं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. 'सिरफिरा'चं दुसरे गाणं 'खुदाया' हे सुफी असून या गाण्याला जबरदस्त प्रसिसाद मिळत आहे. या गाण्यामध्ये अक्षय कुमार आणि राधिका मदन हे वेदनेत बुडलेले दिसत आहेत. 'खुदाया' गाण्यात राधिका आणि अक्षयमधील अनेक भावनिक दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या गाण्याला सागर भाटिया, नीती मोहन आणि सुहित अभ्यंकर यांनी आवाज दिला आहे.

'सिरफिरा'मधील दुसरे गाणं रिलीज :'खुदाया'चं बोल मनोज मुंतशीर यांनी लिहिले आहेत. दरम्यान या चित्रपटामधील पहिल्या गाण्याबद्दल बोलायचं झालं तर 'मार उडी'मधील भाव खूप वेगळा आहे. 'सिरफिरा'चं पहिलं गाणं, 'मार उडी' उत्साह भरलेले आहे. विशेष म्हणजे या गाण्याच्या रिलीजनंतर काही तासही त्याला लाखो व्ह्यूज मिळाले. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अक्षय कुमारला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. कारण याआधी त्याचा रिलीज झालेला 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट रुपेरी पडद्यावर फ्लॉप झाला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ दिसला होता.

'सिरफिरा' हा 'सूरराई पोत्रू'चा हिंदी रिमेक : 'सिरफिरा' हा दक्षिण भारतीय चित्रपट 'सूरराई पोत्रू'चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'सूरराई पोत्रू'मध्ये साऊथ सुपरस्टार सूर्या हा मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. अक्षय कुमार स्टारर 'सिरफिरा' या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा केली जात आहे. या चित्रपटात अक्षय कुमारबरोबर परेश रावल, राधिका मदन आणि सीमा बिस्वास यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'सरफिरा' 12 जुलैला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाबरोबर साऊथचा सुपरस्टार कमल हासनचा 'इंडियन 2' देखील चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा :

  1. 'जगात भारी पंढरीची वारी', विठू-रखुमाईच्या भक्तांना संदीप पाठक देतोय वारीची अनुभूती - Jagat Bhari Pandharichi Wari
  2. खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan
  3. 'चंदू चॅम्पियन'साठी अंगात ताप असताना सलग 9 तास पोहत होता कार्तिक आर्यन, केला व्हिडिओ शेअर - KARTIK AARYAN

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.