ETV Bharat / entertainment

श्रीराम मंदिरच्या उद्घाटन सोहळ्यातील आकाश अंबानी आणि श्लोकाचा फोटो झाला व्हायरल - आकाश अंबानी

Ram mandir pran pritishtha ceremony : आज 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमात अनेक स्टार्सनं हजेरी लावली होती. अंबानी कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.

Ram mandir pran pritishtha ceremony
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 6:35 PM IST

मुंबई Ram mandir pran pritishtha ceremony : रामभक्तांची 500 वर्षांची प्रतीक्षा आज 22 जानेवारीला अखेर संपली. आज श्रीराम अयोध्येतील रामनगरीतील गर्भगृहात पोहोचले आहेत. जोरदार विरोधानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या अभिषेकाचा कार्यक्रम पूर्ण केला आहे. आता देशभरात रामाच्या नावाचा नारा दिला जात आहे. अयोध्येला पोहोचलेल्या राजकारण, व्यवसाय, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बड्या व्यक्तींचे फोटो आणि व्हिडिओ एकामागून सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी, सून श्लोका यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रीराम मंदिरामधील फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल : श्रीराम मंदिरामधील एका फोटोत आकाश-श्लोकासोबत दिग्दर्शक रोहित शेट्टी, विकी कौशल, कतरिना कैफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक सुभाष घई आहेत. याशिवाय या फोटोत राजकुमार हिराणी आणि आयुष्मान खुराना देखील दिसत आहेत. फोटोमध्ये सुभाष घई सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटोमध्ये प्रत्येकाचे चेहरे भक्तीभावाने भरलेले आहेत. या विशेष प्रसंगी या स्टार्सनं श्रीराम नावाचा जयघोष केला. दरम्यान श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होण्याआधी आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल आणि कतरिना कैफ एकाच ई-रिक्षातून राम मंदिरात पोहोचले होते.

  • #WATCH | Actors Vicky Kaushal, Katrina Kaif, Ayushmann Khurrana, Ranbir Kapoor and Alia Bhatt at Shri Ram Janmabhoomi Temple in Ayodhya to attend the Pran Pratishtha ceremony. pic.twitter.com/OJVYpbEnN5

    — ANI (@ANI) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'हे' स्टार्स होते सोहळ्यात उपस्थित : या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, कंगना रणौत, निर्माते मधुर भांडारकर, विवेक ओबेरॉय, अनुपम खेर, दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतील चिरंजीवी, रामचरण, धनुष, रजनीकांत हे स्टार्स या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज अयोध्येत भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. हा दिवस राम भक्तांसाठी खूप विशेष आहे. अयोध्येत सर्वत्र श्रीरामचा जयघोषणा अनेकजण करताना दिसले. अभिनेता अनुपम खेर यांनी रजनीकांत यांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. तसे कमेंट्स येत आहेत.

हेही वाचा :

  1. रणबीर-आलिया ते विकी-कतरिना स्टार कपल प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येत हजर
  2. 'बडे मियाँ छोटे मियाँ' स्टार अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफनं श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी चाहत्यांना दिल्या शुभेच्छा
  3. नोरा फतेहीचा डीपफेक व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.