ETV Bharat / entertainment

'सिंघम'चा आज वाढदिवस, अजय देवगणचे 'हे' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार - Ajay Devgan birthday - AJAY DEVGAN BIRTHDAY

Ajay devgn birthday : अजय देवगण आज 2 एप्रिल रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी आम्ही त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.

Ajay devgn birthday
अजय देवगणचा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 11:41 AM IST

Updated : Apr 2, 2024, 11:48 AM IST

मुंबई - Ajay devgn birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'सिंघम' अजय देवगण आज 2 एप्रिल रोजी आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. अजयनं आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आपल्या अभिनयानं त्यानं बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजयनं 1991 मध्ये आलेल्या 'फूल और कांटे' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. अजय देवगणचा नुकताच 'शैतान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. आता पुढं अजय अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. आज अजयच्या वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल जाणून घेऊया.

  • 'मैदान' : अभिनेता अजय देवगण आजकाल त्याच्या 'मैदान' या स्पोर्ट्स बायोग्राफी चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. अजय देवगण स्टारर हा चित्रपट फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्यावर आधारित आहे. अजय बोनी कपूर, आकाश चावला, अरुणव जॉय सेनगुप्ता आणि झी स्टुडिओ निर्मित या चित्रपटात प्रियामणी, रुद्रनील घोष आणि गजराज राव यांच्याही भूमिका आहेत.
  • 'औरों में कहां दम था' : अजय देवगण स्टारर 'औरों में कहाँ दम था' हा चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज पांडे यांनी केलंय. 'औरों में कहाँ दम था'मध्ये अजयबरोबर तब्बू दिसणार आहे.
  • 'सिंघम अगेन' : रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट मल्टीस्टारर असून या चित्रपटाच्या रिलीजची वाट अनेकजण पाहात आहेत. अजय व्यतिरिक्त या चित्रपटात टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर, अक्षय कुमार, रणवीर सिंग, आणि करीना कपूर खान स्टार्स दिसणार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 15 ऑगस्टला प्रदर्शित होईल.
  • 'रेड 2' : अजय देवगणच्या आगामी चित्रपटांच्या यादीत 'रेड 2'चे नावही आहे. हा चित्रपट 15 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय व्यतिरिक्त रितेश देशमुख आणि वाणी कपूर दिसणार आहेत.
  • 'गोलमाल 5' : अजय देवगण रोहित शेट्टीच्या 'गोलमाल 5' या कॉमेडी चित्रपटही दिसणार आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजय 'गोपाल'च्या कॉमिक भूमिकेत दिसणार आहे.
  • 'दे दे प्यार दे 2' : अजय देवगण अभिनीत 'दे दे प्यार दे 2' 1 मे 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अंशुल शर्मा करणार आहे. या चित्रपटामध्ये अजयबरोबर अभिनेत्री रकुल प्रीत सिंग दिसेल.

हेही वाचा :

  1. 'मजा संपली काम सुरू', कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3'च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू - bhool bhulaiyaa 3
  2. दाऊदलाही आव्हान देणाऱ्या डॉन हुसैन उस्ताराची भूमिका साकारणार कार्तिक आर्यन - kartik aaryan
  3. उर्फी जावेद स्टारर 'लव्ह सेक्स और धोखा 2'चा टीझर प्रदर्शित - love sex aur dhokha 2 teaser

Last Updated : Apr 2, 2024, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.