ETV Bharat / entertainment

कान्सच्या रेड कार्पेटवर दुसऱ्या दिवशी ग्लॅमरस स्टाईलमध्ये अवतरली ऐश्वर्या राय - CANNES FILM FESTIVAL 2024 - CANNES FILM FESTIVAL 2024

CANNES FILM FESTIVAL 2024 : चित्रपट जगतातील सौंदर्यवती आपली जादू दाखवण्यासाठी कान्स 2024 मध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायनंही अतिशय सुंदर स्टाईलमध्ये रेड कार्पेटवर आपल्या सौंदर्याची झलक दाखवत सहभाग घेतला. पाहा, ऐश्वर्याची कान्स महोत्सवातील सुंदर झलक.

Aishwarya Rai
ऐश्वर्या राय (Bewitching Bachchans)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 18, 2024, 9:56 AM IST

मुंबई - CANNES FILM FESTIVAL 2024 : 77व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सेलेब्रिटी स्टार्स शानदार स्टाईलमध्ये रेड कार्पेटवर दमदार एन्ट्री घेत जगभरातील मीडियाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेत आहेत. या महोत्सवात पुन्हा एकदा माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय आपला जलवा दाखवला आहे. कान्सच्या दुसऱ्या दिवसाच्या झलकमध्ये ऐश्वर्या देखील अमेरिकन अभिनेत्री, निर्माती आणि दिग्दर्शिका इवा लॉन्गोरियाबरोबर पोझ देताना कॅमेऱ्यात कैद झाली.

ब्ल्यू अँड सिल्व्हर पोशाखात रेड कार्पेटवर अवतरली ऐश्वर्या

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या पहिल्या दिवशी माजी मिस वर्ल्ड काळ्या आणि सोनेरी पोशाखात खूपच ग्लॅमरस दिसली होती. दुसऱ्या दिवशीही ऐश्वर्याचा कान्स लूक अप्रतिम दिसत होता. ब्ल्यू अँड सिल्व्हर पोशाखात ती खूपच चमकत होती. फाल्गुनी आणि शेन पीकॉक गाऊन परिधान केलेली ही इवा लॉन्गोरियाबरोबर रेड कार्पेटवर पोज देताना दिसली. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय सध्या जखमी आहे. तिच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे तिच्या उजव्या हातावर प्लास्टर घातलेलं होतं.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये अनेक भारतीय सेलेब्रिटी सहभागी होत आहेत. अदिती राव हैदरी, शोबिता धुलिपाला, जॅकलीन फर्नांडिस आणि उर्वशी रौतेला यांसारख्या भारतीय सुंदरी रेड कार्पेटवर शोभण्यासाठी सज्ज आहेत. यामध्ये सामील होण्यासाठी मराठमोळी 'सैराट' फेम अभिनेत्री छाया कदमही कान शहरात दाखल झाली आहे. अलिकडेच तिनं 'लापता लेडीज' आणि 'मडगाव एक्सप्रेस' या चित्रपटात झळकली होती. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' अभिनेत्री दीप्ती साधवानी हिनेही या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. ऐश्वर्या राय बच्चनच्या रेड कार्पेट एन्ट्रीमुळे कान्स महोत्सवाचा दुसरा दिवस संस्मरणीय ठरला.

हेही वाचा -

  1. कान्स फेस्टिव्हल 2024 मध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने वेधलं लक्ष - Cannes Festival 2024
  2. उर्वशी रौतेलाचा सिंड्रेला बनत लाल गाऊनसह कान्स 2024 मध्ये दबदबा - CANNES FILM FESTIVAL 2024
  3. कान्स 2024च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, मुलगी आराध्यानंही जिंकली मनं - Cannes 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.