ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या वयाच्या 13 व्या वर्षी झाली समजूतदार, पापाराझीला म्हटली 'ही' गोष्ट - AISHWARYA RAI - AISHWARYA RAI

Aishwarya Rai and Aaradhya Bachchan : आराध्या बच्चन आणि ऐश्वर्या राय मुंबई विमातळावर स्पॉट झाल्या. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आराध्या पापाराझीला फोटो काढतांना काळजी घेण्यास सांगताना दिसत आहे.

Aishwarya Rai and Aaradhya Bachchan
ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 7:56 PM IST

मुंबई - Aishwarya Rai and Aaradhya Bachchan : आराध्या बच्चन तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. आराध्या ही स्टारकिड्समध्ये सर्वाधिक चर्चेत असते. आजकाल ती अनेकदा तिची आई ऐश्वर्या रायबरोबर कार्यक्रमांमध्ये जाताना दिसते. अलीकडेच, ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. दोघेही बच्चन कुटुंबासोबत लग्नाला आल्या नव्हत्या, त्या वेगळ्या आल्या होत्या. मात्र कार्यक्रमादरम्यान अभिषेक बच्चनबरोबर दिसल्या. अंबानी फॅमिली फंक्शन झाल्यानंतर दोघेही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाल्या आहेत. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहेत.

ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन मुंबईवर झाल्या स्पॉट : व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय आणि आराध्या दोघीही काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. दोघांनीही त्यांच्या पोशाखांबरोबर मॅचिंग बॅग घेतल्या आहेत. यावेळी ऐश्वर्या राय आणि आराध्या पापाराझींशी बोलल्या आणि त्याच दरम्यान आराध्यानं एका पापाराझीला काळजीपूर्वक फोटो काढण्यास सांगितलं. यानंतर दोघेही विमानतळाच्या आत प्रवेश करतात. ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन यांच्यातील बॉडिंग खूप अप्रतिम आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही दोघे एकमेकांची काळजी घेताना दिसल्या. ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या बच्चन 13 व्या वर्षाची आहे. इतक्या लहान वयात खूप हुशार असल्याचं अमिताभ बच्चन यांनी अनेकदा म्हटलं आहे.

आराध्यानं लूकमध्ये केला बदल : आराध्या अंबानी स्कूलमध्ये शिकते. कमी वयातच आराध्याला अनेक गोष्टीचं ज्ञान आहे. दरम्यान विमातळावर आराध्याच्या लूकमध्येही बदल दिसून आला आहे. तिनं आपली हेअरस्टाईल खूप बदलली आहे. दरम्यान यापूर्वी श्वेता बच्चन नंदाची मुलगी नव्या नवेली नंदानं देखील आराध्याचं कौतुक केलं होत. तिनं एका संवादादरम्यान सांगितलं होत की, आराध्या ही खूप समजदार आहे. याव्यतिरिक्त तिला तिची आई ऐश्वर्या राय देखील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेत असते. याआधी ऐश्वर्यानं तिला कान फिल्म फेस्टिवलमध्ये नेले होते. यावेळी ऐश्वर्या आणि आराध्या खूप चर्चेत आल्या होत्या. अनेकदा ऐश्वर्या आपल्या मुलीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा :

  1. अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या रायनं बच्चन कुटुंबासह येणं टाळलं, पुन्हा नव्या अटकळांना चालना - Aishwarya Rai Bachchan
  2. अनंत-राधिकाच्या लग्नात अमिताभ आणि जया बच्चनच्या पाया पडला शाहरुख खान - Anant Radhika Wedding
  3. नेत्रदीपक शाही सोहळ्यात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबद्ध - ANANT AMBANI RADHIKA WEDDING

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.