ETV Bharat / entertainment

कान्स 2024च्या रेड कार्पेटवर ऐश्वर्या राय बच्चनचा जलवा, मुलगी आराध्यानंही जिंकली मनं - Cannes 2024 - CANNES 2024

Cannes 2024 : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन प्रत्येक वेळी तिच्या उपस्थितीने कान्स फिल्म फेस्टिव्हलची शोभा वाढवत असते. यंदाच्या फेस्टीव्हलमध्ये हाताला दुखापत असतानाही प्लॅस्टर घालून कार्पेटवर उतरल्यानं चाहत्यांची मनं तिनं जिंकली आहेत.

Cannes 2024
कान्स 2024 (Aishwarya Rai Bachchan Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 10:05 AM IST

मुंबई - Cannes 2024 : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. ऐश्वर्या रायनं प्रत्येक वेळी प्रमाणेच यावेळीही कान फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सहभाग घेतला. कान्सच्या रेड कार्पेटवरून डौलदार चालतानाचे तिचे सुंदर फोटो आले आहेत. ऐश्वर्या आपली मुलगी आराध्याबरोबर कान्सला पोहोचली आहे. माजी विश्वसुंदरी असलेल्या ऐश्वर्या रायचं इथं जंगी स्वागत करण्यात आलं. 16 मे रोजी रेड कार्पेटवर ऐश्वर्यानं आपल्या उपस्थितीने प्रेक्षकांना मोहित केले. इतकेचं नाही तर तिची मुलगी आराध्यानं देखील ऐश्वर्याबरोबर नेटिझन्सची मने जिंकली.

सोनेरी डिझाइनच्या गाऊनमध्ये ऐश्वर्या रेड कार्पेटवर

77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या रायनं तिच्या उपस्थितीनं 'मेगालोपोलिस' रेड कार्पेटची शोभा वाढवली. माजी मिस वर्ल्डने गोल्डन-ब्लॅक आणि व्हाइट कॉम्बिनेशन गाऊनमध्ये रेड कार्पेटवर उतरुन उपस्थितांना थक्क केलं आणि सर्वांची मनं जिंली. ऐश्वर्या राय बच्चननं यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये फॅशन डिझायनर्स फाल्गुनी आणि शेन यांच्या कालातीत सोनेरी डिझाइनचा गाऊन परिधान केला होता. गाऊनमध्ये सुंदर सोन्याच्या फुलांची सजावट असल्यानं हे एक शाही आकर्षण बनलं होतं. मोठ्या ठळक सोनेरी कानातले घालून ऐश्वर्यानं तिच्या वेशात भव्यता वाढवली. तिच्या गाऊनच्या पुढच्या बाजूला एक सुंदर सोनेरी पॅटर्न आणि प्रचंड रफल्ड स्लीव्हज होते. ऐश्वर्याचं दिसणं भव्य असली तरी आराध्याच्या गोड हावभावामुळे तिनंही उपस्थितांची मनं जिंकुन घेतली.

ऐश्वर्याचे सुरुवातीचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर लगेचच तिचे चाहते मायलेकीच्या या जोडीवर कौतुकाचा वर्षाव करताना दिसले. दुखापतग्रस्त हात असूनही कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल अनेकांनी तिचे कौतुक केले, तर विशेषत: आराध्याचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला. आराध्या तिच्या आईबरोबर कान्सला गेली असताना व्हिडिओमध्ये ती त्यांच्या कारमधून मुख्य कार्यक्रमासाठी हातात हात घालून फिरताना दिसत आहे. याआधी, आराध्याला देखील मुंबई विमानतळावर ऐश्वर्यासोबत स्पॉट करण्यात आले होतं, तिच्या हाताला दुखापत असल्याने ती तिच्या आईची बॅग धरून होती.

हातावर प्लॅस्टर घालून ऐश्वर्या राय रेड कार्पेटवर उतरली

77 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये रेड कार्पेट क्वीन ऐश्वर्याची जादू पाहण्यासासाठी ऐश्वर्या राय बच्चनचे सर्व चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. हाताला दुखापत असतानाही ती रेड कार्पेटवर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. हातावर प्लॅस्टर घालून ती रेड कार्पेटवरही पोहोचली होती तरी, तिच्या सौंदर्याची चमक अजिबात कमी झाली नाही. कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील ऐश्वर्या रायची ही पहिली झलक पाहणाऱ्या चाहत्यांची मनं तिनं जिंकली आहेत.

हेही वाचा -

अभिनेत्री छाया कदम कान फिल्म फेस्टीव्हलसाठी रवाना, अनेक सेलेब्रिटींकडून कौतुकाचा वर्षाव - Cannes Film Festival 2024

दीपिका पदुकोणच्या सोनोग्राफीचा डीपफेक फोटो व्हायरल, पाहा पोस्ट - Deepika Padukone And Ranveer Singh

कियारा अडवाणी आणि ऐश्वर्या राय बच्चन कान फेस्टिव्हलसाठी रवाना - KIARA ADVANI AND AISHWARYA RAI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.