ETV Bharat / entertainment

ऐश्वर्या राय बच्चनने शेअर केले आराध्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो - AARADHYA BIRTHDAY PARTY

आराध्या बच्चनचा 13 वा वाढदिवस घरगुती पद्धतीनं साजरा झाला. याचे काही फोटो सुंदर कॅप्शनसह ऐश्वर्या रायनं पोस्ट केले आहेत.

Aaradhya's birthday party
आराध्याच्या वाढदिवसाचे फोटो (Photo @aishwaryaraibachchan_a Instagram / ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 1:47 PM IST

मुंबई - अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्या हिचा 13 वा वाढदिवस 16 नोव्हेंबरला घरगुती पद्धतीनं साजरा झाला. या सेलेब्रिशनमधील काही फोटो ऐश्वर्यानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांच्या जयंतीनिमित्तानं तिच्या मुलीच्या वाढदिवसाचे काही फोटो तिनं शेअर केले आहेत.

एका फोटोत आराध्या तिच्या दिवंगत आजोबांच्या पोर्ट्रेटसमोर आदरपूर्वक नतमस्तक होताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ऐश्वर्या आणि आराध्याला ऐश्वर्याची आई वृंद्या राय यांच्याबरोबर फोटोसाठी पोज देतना दिसत आहे. फोटोंच्या या मालिकेत नवजात आराध्याचे काही थ्रोबॅक फोटोही आहेत. मुंबईत पूर्वी पार पडलेल्या आराध्याच्या वाढदिवसाचे काही जुने फोटोही यामध्ये आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ऐश्वर्यानं लिहिलंय की, "माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय बाबा-आज्जा आणि माझ्या प्रिय आराध्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे हृदय, माझा आत्मा... सदैव आणि त्या पलीकडेही राहील."

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 मध्ये विवाह केल्यानंतर त्यांना आराध्या ही लेक 2011 मध्ये झाली होती. कामाच्या आघाडीचा विचार करता, ऐश्वर्या राय बच्चननं या वर्षी सप्टेंबरमध्ये दुबई येथे झालेल्या दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (SIIMA) 2024 मध्ये लीडिंग रोलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला होता.

ऐश्वर्याला मणिरत्नम यांच्या पोनियिन सेल्वन 2 मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी हा पुरस्कार मिळाला होता. मणिरत्नम दिग्दर्शित पोन्नियिन सेल्वन 2 हा याच नावाच्या 2022 मध्ये आलेल्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. अभिनेता कमल हासनने चित्रपटाच्या कथनाला आपला व्हाईस ओव्हर दिला होता आणि ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांनी या चित्रपटाला संगीत दिले होते.

दुसरीकडे, अभिषेक बच्चन आगामी 'आय वॉन्ट टू टॉक'मध्ये दिसणार आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' ची निर्मिती रॉनी लाहिरी आणि शील कुमार यांनी केली आहे आणि 22 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. अभिषेक बच्चन याच्यासह या चित्रपटात जॉनी लीव्हर, बनिता संधू, पर्ल माने, जयंत कृपलानी आणि अहिल्या बामरू या कलाकारांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.