ETV Bharat / entertainment

अमिताभची अभिनयात 55 वर्षे, अर्थपूर्ण AI फोटो केला शेअर

अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्थानी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता, त्याला आता 55 वर्षे उलटली आहेत. या काळात एक महान अभिनेता म्हणून त्यांची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. अलिकडेच त्यांनी एक AI फोटो शेअर करुन या बातमीला उजाळा दिला आहे.

Amitabh's acting career
अमिताभ बच्चन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 2:32 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आजवरच्या सरस अभिनय प्रतिभेमुळं अमिताभ बच्चन यांना अनेक उपाध्या मिळाल्या आहेत. कोणी त्यांना 'बिग बी' म्हणतं तर कोणी 'सदी के महानायक' तर 'मेगास्टार', 'महानायक', 'शहेनशाह' अशा अनेक नावांनी ते ओळखले जातात. अमिताभ यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्तानी' चित्रपटापासून केली. आता त्यांचा हा गौरवशाली चित्रपट प्रवास गेली 55 वर्षे अखंडपणे सुरू आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अभिनेता म्हणून बॉलिवूडमधील त्यांच्या प्रवासाची AI आवृत्ती शेअर केली. आपल्या अभिनय कारकिर्दीला 55 वर्षे पूर्ण झाल्या उल्लेखही त्यांनी पोस्टमध्ये केलाय. अमिताभचे मन सिनेमा आणि त्याच्या निर्मितीने भरलेले दाखवणारी AI इमेज शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "55 वर्षे सिनेमाच्या या अद्भुत जगात.. आणि AI ने मला त्याचा अर्थ समजवला आहे."

अभिनेताव अमिताभ बच्चन भारतीय चित्रपटसृष्टीत 55 वर्षे पूर्ण करत आहेत या त्यांच्या खुलाश्याने चाहत्यांना आनंदी आणि नॉस्टॅल्जिक केलं आहे. एका चाहत्याने लिहिले, “बिग बी सर अप्रतिम व्यक्तिमत्व. तुमच्याकडे अप्रतिम कौशल्य आहे सर. हॅट्स ऑफ टू यू आणि मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी तुमचे चित्रपट पाहत आहे. तुम्ही आमच्यासाठी खरोखर प्रेरणा आहात. सर तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आहे.” आणखी एका चाहत्याने लिहिले, “चित्रपटात अमिताभ बच्चनची ५५ वर्षे. त्याच्या आधी कोणी नाही, त्याच्या नंतर कोणी नाही. अजेय ५५ वर्षे. जगातील सर्वोत्तम अभिनेता. अमिताभजींचे अभिनंदन. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो"

अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' 13 च्या एका एपिसोडदरम्यान, 'सात हिंदुस्तानी' या त्यांच्या पहिल्या चित्रपटाबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला होता. अमिताभ जेव्हा 'सात हिंदुस्थानी' चित्रपटाची ऑडिशन द्यायला गले होते तेव्हा दिग्दर्शक यांना समजले की तो दिग्गज कवी हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहे. त्यांनी तातडीने त्यांच्या वडिलांना फोन केला आणि तो ऑडिशन देणार असल्याचं सांगितलं होते. त्यांना वाटलं होतं की ते वडिलांना न सांगताच सिनेमाच्या क्षेत्रात येत आहे. परंतु अमिताभ यांनी याची कल्पना वडिलांना आधीच दिली असल्यामुळे ख्वाजा अहमद अब्बास समाधानी झाले.

गेल्या काही वर्षांत अमिताभ यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील 'अँग्री यंग मॅन' म्हणून त्यांनी साकारलेल्या अनेक पात्रांचा चिरंतन प्रभाव पडलाय. वयाच्या 80 नंतरही अमिताभ अतिशय उत्साहात सेटवर हजर राहतात आणि नव्या दिग्दर्शकाकडूनही आपली भूमिका एखाद्या विद्यार्थ्यासारखं समजून घेत असतात. आता ते नाग अश्विनच्या आगामी 'कल्की 2898 एडी' चित्रपटात दिसणार आहेत. त्यानंतर रजनीकांतसह 'वेट्टियाँ' या चित्रपटातही अमिताभ दिसणार आहेत.

हेही वाचा -

  1. वडिलांच्या नावानं बांधलेल्या स्मारकाच्या उद्घाटनावेळी रवीना टंडन झाली भावूक
  2. 'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही"
  3. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.