ETV Bharat / entertainment

अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्किस' चित्रपटासाठी सज्ज, केली पोस्ट शेअर - agastya nanda share pic - AGASTYA NANDA SHARE PIC

Agastya Nanda : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा स्टारर आगामी 'इक्किस' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अगस्त्य परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या भूमिकामध्ये दिसणार आहे.

Agastya Nanda
अगस्त्य नंदा (अगस्त्य नंदा (IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 10, 2024, 5:33 PM IST

मुंबई - Agastya Nanda : दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आगामी 'इक्किस' चित्रपटामुळे आता चर्चेत आला आहे. त्यानं अलीकडेच त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. यात तो तपकिरी खुर्चीवर बसलेला दिसला आणि त्याच्या मागे 21 असं लिहिलं होतं. दरम्यान 'इक्किस' चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र, वरुण धवन आणि जयदीप अहलावत यांच्याही विशेष भूमिका आहेत. अगस्त्यानं हा फोटो शेअर करताच चाहते खूप उत्साहित झाले, कारण 'द आर्चीज'नंतर अगस्त्यचा हा दुसरा चित्रपट आहे. 'इक्किस' चित्रपट परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटात 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध दाखवलं जाणार आहे.

Agastya Nanda
अगस्त्य नंदा (Agastya Nanda - instagram)

अगस्त्य नंदाचा 'इक्किस' चित्रपट : अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदानं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यानं अभिनयालाच करिअर म्हणून निवडलं आहे. 'द आर्चीज'मध्ये त्यानं सुहाना खान आणि खुशी कपूर यांसारख्या नवोदित कलाकारांबरोबर काम केलं आहे. आता त्यानं 'इक्किस'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. याशिवाय या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन हे करत आहेत. या चित्रपटाबाबत अद्यापही काही अपडेट आलेली नाही. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये या चित्रपटाबाबत अपडेट येणार असल्याचा अंदाज आता लावला जात आहे.

'इक्किस'मध्ये दिसेल 'ही' अभिनेत्री : रिपोर्टनुसार, श्रीराम राघवनच्या 'इक्किस'साठी अगस्त्यचं नाव फायनल केल्यानंतर आता या चित्रपटाची अभिनेत्रीही फायनल झाली आहे. अक्षय कुमारची भाची सिमर भाटिया या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समजत आहे. 'इक्किस'मधील सिमरची भूमिका फार मोठी नाही असं म्हटले जात आहे. तिनं या चित्रपटातील तिच्या बहुतांश भागाचे शूटिंग पूर्ण केलं आहे. अगस्त्य या चित्रपटात अरुण खेतरपालची भूमिका साकारत आहे, तर त्याचे वडील एम.एल. खेतरपालच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'सिकंदर'च्या अ‍ॅक्शन सीनसाठी सलमान खान सज्ज, या दिवसापासून सुरू करणार शूटिंग - Salman Khan
  2. कामाच्या धबडग्यातून प्रियांका चोप्रानं काढला लेकीसाठी वेळ, केला व्हिडिओ शेअर - priyanka chopra share video
  3. 'कल्की 2898 एडी'च्या ट्रेलरनं वाढवली प्रेक्षकांची उत्कंठा, अ‍ॅडव्हान्स बुकिंगचीही उघडली खिडकी - Kalki 2898 AD Trailer

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.