ETV Bharat / entertainment

'फेमिनिज्म'वर वादग्रस्त विधान दिल्यानं नोरा फतेही चर्चेत, सोनाली बेंद्रे आणि श्रिया पिळगावकरनं दिली प्रतिक्रिया - Nora Fatehi Sonali Bendre - NORA FATEHI SONALI BENDRE

Sonali Bendre and Nora Fatehi : नोरा फतेही एका मुलाखतीत 'फेमिनिज्म'वर वादग्रस्त विधान केल्यानंतर ती चर्तेत आली होती. आता यावर 'द ब्रोकन न्यूज'च्या स्टार कास्टनं प्रतिक्रिया दिली आहे.

Sonali Bendre and Nora Fatehi
सोनाली बेंद्रे आणि नोरा फतेही
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 27, 2024, 11:55 AM IST

मुंबई - Sonali Bendre and Nora Fatehi : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीनं 'फेमिनिज्म'वर वादग्रस्त विधान केलं. एका मुलाखतीत तिनं 'फेमिनिज्म'सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसल्याचं म्हटलं होतं. तिनं 'द रणवीर' शोला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "मला वाटतं, 'फेमिनिज्म'नं आपला समाज उद्ध्वस्त केला आहे.' यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर यांनी 'फेमिनिज्म'च्या खऱ्या अर्थावर आपले मत मांडले आहे. सोनालीनं जेनिस सिक्वेरा यांच्या मुलाखतीत म्हटलं, "लोकांना स्त्रीवादाचा खरा अर्थ कळत नाही, त्यामुळे चुकीची व्याख्या समाजात पसरली आहे."

श्रिया आणि सोनालीनं 'फेमिनिज्म'वर दिली प्रतिक्रिया : पुढं तिनं म्हटलं, "फेमिनिज्म'चा अर्थ पुरुषावर टीका करणं असा नाही. तुम्ही आणि मी समान हक्क शोधत आहोत आणि समान हक्क हवेत, मग त्यात गैर ते काय. तराजूचे संतुलन राखणे याला 'फेमिनिज्म' म्हणतात आणि हे समजावून सांगावे लागेल, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही." यानंतर श्रिया आणि जयदीप यांनी 'फेमिनिज्म'चा खरा अर्थ सांगितला. जेनिस सिक्वेरा यांच्याशी बोलताना, 'फेमिनिज्म'वरील प्रश्नावर श्रिया पिळगावकरनं सर्वप्रथम प्रतिक्रिया म्हटलं, "लोकांनी गुगलवर 'फेमिनिज्म'ची व्याख्या शोधली नाही. 'फेमिनिज्म' समान हक्कांबद्दल बोलतो आणि मला असं वाटतं की, अनेकजण स्त्रीवादी आहेत. 'फेमिनिज्म'चा विचार हा अधिकारांबद्दल आहे." जयदीपनं देखील आपली प्रतिक्रिया यावेळी मांडली.

'द ब्रोकन न्यूज'बद्दल : दरम्यान 'द ब्रोकन न्यूज' या वेब सीरीजचं दिग्दर्शन विनय वायकुळे यांनी केलंय. या वेब सीरीजची कहाणी संबित मिश्रा यांनी लिहिली आहे. 'द ब्रोकन न्यूज'मध्ये सोनाली बेंद्रे, श्रिया पिळगावकर आणि जयदीप अहलावत हे महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. 'द ब्रोकन न्यूज'चा दुसरा सीझन 3 मे 2024 पासून ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर प्रसारित होईल. यामध्ये प्रेक्षकांना मीडियाच्या जगात घडणाऱ्या रंजक गोष्टी पाहायला मिळणार आहे. आता अनेकजण या वेब सीरीजची वाट आतुरतेनं पाहात आहेत. या वेब सीरीजच्या माध्यामातून सोनाली बेंद्रेनं ओटीटीवर डेब्यू केला आहे.

हेही वाचा :

  1. 20 वर्षांनी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला विजयचा ‘घिल्ली’, चित्रपटाची कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकित - Thalapathy Vijay
  2. महिलांच्या हक्कांविषयी जागृत करणारी प्रियांका चोप्रा जोनास निर्मित डॉक्युमेंटरी, "WOMB"! - Priyanka Chopra
  3. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन 14 वर्षांनंतर फॅन्टसी हॉरर चित्रपटासाठी एकत्र - Akshay Kumar

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.