ETV Bharat / entertainment

केंद्राने फटकारल्यानंतर नेटफ्लिक्सचं विमान योग्य 'रन वे' वर, 'आयसी 814 द कंधार हायजॅक'मध्ये केला मोठा बदल - netflix india - NETFLIX INDIA

IC 814: The Kandahar Hijack: विजय वर्मा स्टारर 'आयसी 814 द कंधार हायजॅक'मध्ये दहशतवाद्यांची नावं बदलल्याबद्दल केंद्र सरकारने 'नेटफ्लिक्स'ला फटकारलं होतं. आता त्यानंतर 'नेटफ्लिक्स'नं या वेब सीरीजमध्ये दहशतवाद्यांची खरी नावे जोडली आहेत.

IC 814: The Kandahar Hijack
आईसी 814 द कंधार हायजॅक (IC 814: द कंधार हायजॅक (Series Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 4, 2024, 11:14 AM IST

मुंबई- IC 814: The Kandahar Hijack: 'नेटफ्लिक्स'वर नुकतीच प्रदर्शित झालेली वेब सीरीज 'आयसी 814 द कंधार हायजॅक' ही अपहरणकर्त्यांच्या सांकेतिक नावांवरून वादात सापडली आहे. 1999 मध्ये झालेल्या इंडियन एअरलाइन्सच्या अपहरण झालेल्या फ्लाइटवर आधारित असलेल्या या वेब सीरीजमध्ये बर्गर, डॉक्टर, भोला, शंकर आणि चीफ यांसारखी काही अपहरणकर्त्यांची सांकेतिक नावं वापरली गेली होती. शंकर आणि भोला या नावांवर काहीजणांनी आक्षेप घेतला होता. 'आयसी 814 द कंधार हायजॅक' या वेब सीरीजमध्ये दहशतवाद्यांची हिंदू कोड नेम वापरल्यामुळे नेटिझन्सनी खूप विरोध केला होता.

अपहरणकर्त्यांची खरी नाव बदलवली : अपहरणकर्त्यांची खरी ओळख बदलणे म्हणजे ऐतिहासिक घटनांचं चुकीचं चित्रण करण्यासारखे असल्याचा युक्तिवाद केला गेला होता. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी 'नेटफ्लिक्स इंडिया'च्या कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांना बोलावलं आणि या वेब सीरिजमधील काही गोष्टींबाबत सरकारची तीव्र नाराजी व्यक्त केली. या वेब सीरीजमध्ये नावे बदलून भोला, डॉक्टर, बर्गर, शंकर आणि चीफ अशी ठेवण्यात आली होती. या अपहरणकर्त्यांची खरी नावे शाहिद अख्तर सईद, सनी, अहमद काझी, इब्राहिम अथर, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी आहेत. दहशतवाद्यांची नावे बदल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता.

'आयसी 814 द कंधार हायजॅक' सीरीजबद्दल वाद : एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं यावेळी सांगितलं की, "ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे समाजावर काही गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. मुद्दा हा आहे की आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. तुमचा विचार काय? आमचा विचार काय? एकमेकांना समजून घेण्याची आणि काही गोष्टींचा समाजावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेण्याची खूप गरज आहे. या देशातील जनतेच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कुणालाही नाही." असा युक्तिवाद देखील वेब सीरीजविरोधात करण्यात आला होता. यानंतर सरकारनं 'आयसी 814 द कंधार हायजॅक' सीरीजबद्दल कडक भूमिका घेतली आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या वेब सीरीजमध्ये विजय वर्मा, पत्रलेखा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, अरविंद स्वामी, दिया मिर्झा अशा दिग्गज कलाकारांची फळी आहे. ही वेब सीरीज पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना हरकत-उल-मुजाहिदीननं केलेल्या विमानाच्या अपहरणाच्या सत्यकथेवर आधारित आहे.

हेही वाचा :

  1. विजय वर्मा स्टारर 'आईसी 814 द कंधार हायजॅक'वर टांगती तलवार, याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल - vijay varma
  2. 'आयसी 814: द कंधार हाईजॅक'वर बंदीची मागणी, विजय वर्मा स्टारर वेब सीरीजवर यूजर्स झाले नाराज - IC 814 the Kandahar Hijack

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.