ETV Bharat / entertainment

पवित्रा पुनियाबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर एजाज खाननं रिलेशनशिपबद्दल केला खुलासा - Pavitra and Ejaz relationship - PAVITRA AND EJAZ RELATIONSHIP

Eijaz Khan and Pavitra Punia: 'बिग बॉस 14' फेम एजाज खान आणि पवित्रा पुनिया यांच्या ब्रेकअपच कारण आता समोर आलं आहे. एजाजनं आता याबद्दल एक खुलासा केला आहे.

Eijaz Khan and Pavitra Punia
एजाज खान आणि पवित्रा पुनिया
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 5:06 PM IST

मुंबई - Eijaz Khan and Pavitra Punia: टीव्हीचे सर्वात लोकप्रिय जोडप्यापैकी एक एजाज खान आणि पवित्रा पुनिया काही काळापूर्वी वेगळे झाले. पवित्रा आणि एजाजची प्रेमकहाणी बिग बॉस 14 मध्ये सुरू झाली होती, चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडली होती. दरम्यान रिॲलिटी शो 'बिग बॉस 14' मध्ये त्यांच्या नात्याची पुष्टी केल्यानंतर, या जोडप्यानं लग्न करण्याचा निर्णय केला होता. यानंतर या जोडप्यानं 2020 मध्ये एंगेजमेंट केली. साडेतीन वर्षे एकत्र राहूनही या जोडप्यानं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतर एजाज खान हा आपल्या नात्याबद्दल आता खुलेपणानं बोलला आहे.

एजाज खाननं केला नात्याबद्दल खुलासा : एजाज त्याच्या नात्याबद्दल बोलताना म्हटलं, 'या नात्यातून पुढे जाणे खूप कठीण होतं, इतक्या लवकर कोणत्याही नात्यातून बाहेर पडणं सोपं नसतं. यातून सावरायला मला थोडा वेळ लागला.'' एजाज खाननं पवित्रा पुनियाची फसवणूक केल्याच्या अफवा होत्या. यामुळे त्याचं नात तुटल्याचं बोललं जात होतं. आता ही अफवा फेटाळून लावत एजाजनं सांगितलं, ''मी पवित्राची फसवणूक केली नाही. मी तिच्याबरोबर पूर्णपणे एकनिष्ठ होतो. आम्ही दोघंही एकत्र राहत होतो. माझ्या आयुष्यात कुठलीही दुसरी मुलगी नव्हती आणि हे आजपर्यंत कायम आहे.'' एजाज सध्या अविवाहित आहे आणि इतर कोणत्याही नात्यात येण्यास तयार नाही.

एजाज खानचं नात : एजाजनं पुढं सांगितलं, ''आमच्यामध्ये अनेक समस्या होत्या आणि एक वेळ अशी आली, जेव्हा आम्हाला समजले की समस्या सोडवता येणार नाहीत. तेव्हाच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला.'' एजाज खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो बालाजी टेलिफिल्म्सच्या 'काव्यांजली', आणि 'क्या होगा निम्मो का' या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारून त्यानं प्रसिद्धी मिळवली. याशिवाय त्यानं 'कुछ ना कहो', 'जवान', 'तनु वेड्स मनु रिटनर्स', 'मैने दिल तुझको दिया', 'जमीन', 'मीराबाई नॉट आउट', 'लकी कबूतर', 'जिला गाजियाबाद' , 'अपस्टार्ट्स', 'जस्ट मॅरीड' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

हेही वाचा :

नॅशनल सिबलिंग डेच्या प्रसंगी जाणून घ्या बॉलिवूडमधील काही सुंदर भावंडाच्या जोडीबद्दल - Siblings Day 2024

वरुण धवन आणि तापसी पन्नू यांनी सांगितलं त्याच्या आयुष्यातील भावंडाचं महत्त्व - National Siblings Day

जोक्विन फिनिक्स आणि लेडी गागा स्टारर 'जोकर 2'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Joker 2 trailer out

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.