ETV Bharat / entertainment

नेपोटिझम वादावर चर्चा करणाऱ्या कंगनाला सहा वर्षानंतर गडकरींकडून मिळालं 'समाधानकारक' उत्तर - कंगना रणौत

कंगना रणौत गेल्या सहा वर्षापासून बॉलिवूडमधील नेपोटिझमवर टीका करत आहे. घराणेशाहीच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलेले भाष्य तिला आपल्या म्हणण्याला दुजोरा देणारं वाटतंय. आपल्या प्रश्नाला समर्पक उत्तर मिळालं असल्याचे तिनं म्हटलंय.

Kangana Ranaut
कंगना रणौत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 1:09 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत फिल्म इंडस्ट्रीतील घराणेशाहीबद्दल सतत बोलत आली आहे. बॉलिवूड नेपोटिझमचा विषयाला तिनेच पहिल्यांदा सुरू केला. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये तिने करणवरच नेपोटिझमचा आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. करण जोहर नेहमी स्टार किड्सना संधी देत असतो. आजवर अनेक स्टार्सची मुलं, मुली त्याने या क्षेत्रात लॉन्च केली आहेत. त्यांच्यासाठी चित्रपटांची निर्मिती त्यानं केली आहे. त्यामुळे या क्षेत्रात अभिनय कारकिर्द करण्यासाठी संघर्षशील असलेल्या गुणी कलाकारांना संधी मिळत नाही असा सूर फिल्म इंडस्ट्रीत जोर धरु लागला.

Kangana Ranaut
कंगना रणौतने पोस्ट केलेला फोटो

नेपोटिझमच्या चर्चेला खऱ्या अर्थाने जास्त हवा मिळाली ती सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर. त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले, त्याला इथले प्रस्थापित निर्माते सहकार्य करण्याऐवजी त्रास देतात अशा अर्थाच्या चर्चांना त्यांच्या मृत्यूनंतर उधाण आले होते. अर्थात या सर्वामध्येही कंगना रणौत आघाडीवरच होती. ती सतत फिल्म इंडस्ट्रीतील 'आतले' आणि 'बाहेरचे' या विषयावर बोलत असते. ती स्वतःला 'बाहेर'ची मानते आणि प्रस्थापित निर्मांत्याच्या विरोधात नेहमी आगपाखड करत असते.

कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गडकरी घराणेशाहीवर भाष्य करताना दिसतात. कंगनाने गडकरींचा संदर्भ देत लिहिले की, "मी नेपोटिझम नावाचा सर्वात मोठा वादविवाद पेटवून ६ वर्षे झाली आहेत. इतक्या लोकांना याबद्दल विचारण्यात आले, मला पहिल्यांदाच या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळाले." व्हिडिओमध्ये गडकरी जे बोलत आहेत त्यातील त्यांचा दृष्टीकोन कंगनाला पटला आहे.

या व्हिडिओत घराणेशाहीबद्दल बोलताना नितीन गडकरी म्हणतात की, आपण पक्षाची पोस्टर्स लावून तळागाळापसून राजकारणाला सुरुवात केली आणि कठोर परिश्रमाने यश मिळवले. त्यांनी स्पष्ट केले की जर त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला राजकारणात प्रवेश करायचा असेल तर त्यांनी आपल्या पदाचा गैरफायदा न घेता किंवा उच्च पदांची मागणी न करता त्याला सुरवातीपासून सुरुवात करावी लागेल. शिवाय, गडकरींनी जोर दिला की त्यांच्या कुटुंबाला त्यांची संपत्ती वारसाहक्काने मिळू शकते, परंतु त्यांचा राजकीय वारसा त्यांच्या नातेवाईकांचा नाही तर त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांचा आहे.

दरम्यान, व्यावसायिकदृष्ट्या कंगना "इमर्जन्सी" या चित्रपटाच्या रिलीजची ती तयारी करत आहे आणि ज्यामध्ये ती इंदिरा गांधींची भूमिका करताना दिसणार आहे. अलिकडेच तिने आर. माधवनसह एका थ्रिलर चित्रपटासाठी चित्रीकरण सुरू केले आहे. विकास बहल दिग्दर्शित "क्वीन" च्या सीक्वलमध्ये तसेच "तनु वेड्स मनू" च्या तिसऱ्या भागातून तिच्या पुनरागमनाचीही चाहत्यांना अपेक्षा आहे.

हेही वाचा -

  1. रजनीकांतला इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून सहप्रवाशांना गगन ठेंगणे
  2. जीतू भैय्या नव्या आव्हानासाठी पुन्हा सज्ज, 'कोटा फॅक्टरी सीझन 3' चा टीझर रिलीज
  3. वरुण, क्रिती ते विक्रांत मॅसीपर्यंत बॉलिवूड सेलेब्रिटींनी केले दीपिका-रणवीरचे अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.