ETV Bharat / entertainment

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे लोल्लापलूझा इंडियाच्या कार्यक्रमात झाले एकत्र स्पॉट - लोल्लापलूझा इंडिया

Aditya Roy-Kapoor Ananya Panday: अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे लोल्लापलूझा इंडिया 2024च्या कार्यक्रमात एकत्र दिसले. त्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Aditya Roy-Kapoor Ananya Panday
आदित्य रॉय-कपूर अनन्या पांडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 30, 2024, 10:53 AM IST

Updated : Jan 30, 2024, 11:30 AM IST

मुंबई - Aditya Roy-Kapoor Ananya Panday: अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे बी-टाऊनमधलं कथित कपल आहे. या जोडप्याने त्यांच्या नात्याचा उघड स्वीकार केला नसला तरी, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेकदा चर्चा सोशल मीडियावर होत असते. लोल्लापलूझामध्ये अनन्या आणि आदित्य हे एकत्र दिसले. आता या कथित कपलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोघांनी गॉर्डन मॅथ्यू थॉमस समनरच्या मैफिलीचा एकत्र आनंद लुटला. अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरसाठी परदेशी कलाकाराचा परफॉर्मन्स डेट नाईटपेक्षा कमी नव्हता. दरम्यान, या कपलचा व्हिडिओ पापाराझीनं त्याच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे.

आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे झाले स्पॉट : व्हिडिओमध्ये आदित्य रॉय कपूर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. त्यानं कार्गो स्टाईल पॅन्ट, टोपी, चेकचा शर्ट घातला आहे. दरम्यान, अनन्यानं लाल रंगाच्या टॉपवर ब्लू जीन्स परिधान केली आहे. या लूकमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. आजकाल अनन्या पांडे ही आदित्य रॉय कपूरबरोबर अनेक कार्यक्रमात आणि परदेशात सहलीचा आनंद घेताना दिसते. अनन्या पांडे चित्रपट 'खो गये हम कहाँ'च्या यशाचा आनंद घेत आहे. 'खो गये हम कहाँ'मध्ये तिच्याबरोबर सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव यांनी काम केलंय. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्जुन वरण सिंग यांनी आहे. 'खो गये हम कहाँ' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

वर्कफ्रंट : आदित्य आणि अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, शेवटी तो 'गुमराह'मध्ये मृणाल ठाकूरसोबत दिसला होता. आता पुढं त्याचा 'मलंग 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर येणार आहे. याशिवाय तो अनुराग बसू दिग्दर्शित 'मेट्रो इन दिनो'मध्ये सारा अली खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटात फातिमा सना शेख, अली फजल आणि कोंकणा सेन शर्मा यांच्यासह अनेक कलाकार आहेत. दुसरीकडे अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी. शंकरन नायर' या चित्रपटामध्ये अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. आयुष्मान खुरानानं दिली मुंबईत साऊथ कोरियन गायक एरिक नमला ट्रिट
  2. 'बिग बॉस 17' हारल्यानंतर अंकिता लोखंडेनं शेअर केली पोस्ट
  3. 'द इंद्राणी मुखर्जी स्टोरी 'बरीड ट्रुथ' वेब सीरीजचं पहिलं पोस्टर रिलीज

Last Updated : Jan 30, 2024, 11:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.