ETV Bharat / entertainment

अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी'नं ओटीटीवर केला विक्रम - अदा शर्मा

The Kerala Story 150 Million: अदा शर्मा स्टारर चित्रपटाने 'द केरळ स्टोरी' चित्रपटगृहांमध्ये खळबळ माजवल्यानंतर ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला ओटीटीवर अपेक्षेहून जास्त चांगला प्रतिसाद मिळत आहे.

The Kerala Story 150 Million
द केरळ स्टोरी 150 मिलियन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 20, 2024, 10:28 AM IST

Updated : Feb 20, 2024, 2:19 PM IST

मुंबई - The Kerala Story 150 Million : अभिनेत्री अदा शर्माची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'द केरळ स्टोरी' थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी झी5वर रिलीज झाला आहे. या चित्रपटाला ओटीटीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'द केरळ स्टोरी' चित्रपटानं तीन दिवसांत नवा विक्रम केला आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी 'द केरळ स्टोरी'बद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं, ''द केरळ स्टोरी'चे अतुलनीय प्रेक्षक. 'द केरळ स्टोरी' हा ओटीटीचा यशस्वी चित्रपट आहे. शनिवार आणि रविवार लॉन्च दरम्यान 150 दशलक्षपेक्षा जास्त वॉच मिनिटे.'' 'द केरळ स्टोरी' कहाणी अनेकांना आवडली आहे.

'द केरळ स्टोरी' ओटीटीवर प्रदर्शित : या चित्रपटात कुठलाही हिरो नसताना 'द केरळ स्टोरी'नं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुदीप्तो सेन दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. 15 आणि 20 कोटींच्या छोट्या बजेटमध्ये बनलेला या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटात अदा शर्मा व्यतिरिक्त योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बालानी आणि देवदर्शनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'द केरळ स्टोरी' या चित्रपटामध्ये सर्वच पात्राचा अभिनय जबरदस्त होता. हा चित्रपट खऱ्या घटनेवर आधारित आहे. 'द केरळ स्टोरी' चित्रपट 37 देशांमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता.

'द केरळ स्टोरी'ची कहाणी : या चित्रपटाची कहाणी चार महाविद्यालयीन मुलींभोवती फिरते, ज्यांचं ब्रेनवॉश करून त्यांना आयएसआयएस( ISIS) मध्ये सामील होण्यास भाग पाडले जाते. केरळमधील सुमारे 32,000 महिलांचे धर्मांतर झाल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. नंतर मात्र त्यांनी 32,000 हजार या आकड्याच्या बाबतीत घूमजाव केलं. याशिवाय या महिलांना सीरिया आणि इराकमध्ये नेण्यात आले. या चित्रपटाला अनेक वादांना सामोरी जावं लागलं होत. काही राज्यांमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती.

हेही वाचा :

  1. रणवीर सिंगच्या 'डॉन 3' बद्दल फरहान अख्तरची मोठी अपडेट
  2. 'पुष्पा' चित्रपट बनण्यापूर्वी वेब सिरीज करण्याचा होता विचार, दिग्दर्शकानं केला खुलासा
  3. हळवी भावनिक प्रेमकथा असलेल्या 'ऊन सावली' चित्रपटाचा टीझर रिलीज

Last Updated : Feb 20, 2024, 2:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.