शिर्डी ( अहमदनगर ) - Sai Tamhankar visit Sai Mandir : ;चित्रपट कलावंत 'ट्रिकी' प्रश्न विचारले की गांगरतात, असा सर्वसाधारण समज आहे. पण मराठीतली आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरने हा समज खोटा ठरवलाय. चित्रपटांप्रमाणेच राजकारणसुद्धा 'वेट अन्ड वॉच'चा गेम असल्याचं मराठी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिने साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना शिर्डीत म्हटलं. सई आणि साई फक्त एका कानाचा फरक असून देवाच्या दारात आल्यानंतर मनाला शांत आणि प्रसन्न वाटत. चित्रपट तयार होतो मात्र तो किती चालेल हे सांगता येत नाही, तसंच राजकारणाचं देखील शेवटचा निर्णय आल्याशिवाय चित्र स्पष्ट होत नाही,'' अशी भन्नाट प्रतिक्रिया सईने दिली.
देशात कोणाची सत्ता येणार हे मला वाटून काही होणार नाही, मात्र नवीन विचारसरणी येत आहे. आज डिजिटलमध्ये मोठ्या घडामोडी होत असल्याचं सांगत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त आपण नेहमीच राहणार असल्याचंही सईने स्पष्ट केलं आहे. आघाडीची अभिनेत्री असलेल्या सई ताम्हणकर हिने आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं. त्याच बरोबर आज गुरुवार असल्याने साईबाबांच्या दुपारच्या मध्यान्ह आरतीलाही तिनं हजेरी लावली. साईबाबांचं दर्शन घेऊन मनाला समाधान मिळालं असल्याचं यावेळी सई म्हणाली. यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शालसह साई मूर्ती देवून सईचा सत्कार केला.
सईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सई ताम्हणकरने नवी कार घेतली आहे. तिने आपल्या नव्याकोऱ्या आलिशान कारची पूजाही साईबाबांच्या शिर्डीत केलीय. साईबाबा मंदिरातील पुजारींच्या हस्ते साईबाबांच्या मंदिराचा चार नंबर प्रवेशद्वारासमोर सईने आपल्या नवीन लग्झरी कारची पूजा केली. मात्र कारचे फोटो व व्हिडिओ घेण्यास सईने प्रसारमाध्यमांना नकार दिला. मराठी नवीन वर्षाचा अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशी मी माझा सोशल मीडियाचा अकाउंट फोटो अपलोड करून सर्वांनाच मी कार घेतली असल्याचं सरप्राईज देणार असल्याचं सई म्हणाली. त्यामुळे सईची नव्या कारचं मॉडेल, रंग काय या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना गुढीपाडव्यापर्यंत वाट पाहावी लागेल.
कामाच्या आघाडीवर सई ताम्हणकर फरहान अख्तरच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिनं याचा खुलासा केला होता. यामध्ये तिनं एक्सेल प्रॉडक्शन बरोबर काम करण्याचं एक स्वप्न प्रत्येक कलाकाराचं असतं. माझंही ते पूर्ण होत असून यामुळे मला खूप आनंद झाल्याचं ती म्हणाली. सई ताम्हणकरनं यापूर्वी 'भक्षक', 'हंटर', 'मिमी', 'गर्लफ्रेंड' यांसारख्या हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा -