ETV Bharat / entertainment

रुबिना दिलैक रॅम्पवर हाय हिल्समध्ये अडखळली, व्हिडिओ व्हायरल - RUBINA DILAIKS VIDEO

Rubina Dilaik: रुबिना दिलैकचा रॅम्प वॉक करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती हाय हिल्समध्ये अडखळताना दिसत आहे.

Rubina dilaik
रुबिना दिलैक (Rubina dilaik - instagram)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 11, 2024, 12:42 PM IST

Updated : Oct 11, 2024, 1:47 PM IST

मुंबई - Rubina dilaik: टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक ही अनेकदा तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. बऱ्याचदा ती आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान तिचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती रॅम्प वॉक करत असून तिचा अचानक तोल जातो, यानंतर ती तिच्या पायामधील हाय हिल्स काढून बाजूला टाकते आणि आत्मविश्वासानं रॅम्प वॉक करते. रुबिनानं खूप चांगल्या पद्धतीनं स्वतःवर नियंत्रण ठेवले असून आता तिचे चाहते या कृतीमुळे कौतुक करत आहेत. रुबिनानं स्वतःला या ओप्स क्षणाचा बळी होण्यापासून वाचवले.

रुबिना दिलैकचं केलं यूजर्सनं कौतुक : रुबिना ही डिझायनर अर्चना कोचर यांच्या फॅशन शोची शोस्टॉपर होती. रुबीनाचा रॅम्प वॉक करतानाचा हा व्हिडिओ अर्चनानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ती अडखळली का? नाही, तिनं अद्भुत काम केले आहे.' रुबिना रॅम्प वॉक करत असताना अनवाणी पायांनी चालली. आता तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर एका चाहत्यानं लिहिलं, 'खूप चांगलं उदाहरण आहे, आत्मविश्वासाचे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'रुबिनाचा आत्मविश्वास खूप चांगला आहे.' आणखी एकानं लिहिलं, ' रुबिनानं खूप चांगल्या पद्धतीनं स्वत:ला नियंत्रित केलं.'

रुबिना दिलैकचा लूक : रॅम्प वॉक करताना रुबिनानं गडद गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला होता, ज्यावर सोनेरी नक्षी काम केलेलं होतं. तिचा लेहेंगा हा खूप आकर्षक असून तिनं स्ट्रॅपलेस ब्लाउज परिधान केले होते. यावर सोन्याचे दागिने आणि खुल्या केसांसह ती खूप सुंदर दिसत होती. यापूर्वी 'बिग बॉस 13' फेम अभिनेत्री माहिरा शर्माचा एक व्हिडिओ समोर आला होता, यामध्ये माहिरा स्टेजवर जात असताना कोसळली होती. हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका इव्हेंटचा होता. दरम्यान रुबिना दिलैकबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या तिच्या जुळ्या मुलीबरोबर क्वालिटी टाइम घालवत आहे.

हेही वाचा :

  1. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्लांना झाल्या जुळ्या मुलीं, फोटोंसह कळवली मुलींचे नावे
  2. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला यांच्या घरी हलला पाळणा; दिला जुळ्या मुलींना जन्म
  3. Rubina Dilaik oozes retro vibes : रुबिना दिलैकचं मॅटर्निटी फोटोशूट, अभिनव शुक्लानं केले पोस्ट

Last Updated : Oct 11, 2024, 1:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.