ETV Bharat / entertainment

मौनी रॉयनं वाढदिवसानिमित्त पती सूरज नांबियारबरोबरचे रोमँटिक फोटो केले शेअर - mouni roy shares romantic photos - MOUNI ROY SHARES ROMANTIC PHOTOS

Mouni roy : मौनी रॉयनं पती सूरज नांबियारच्या वाढदिवसानिमित्त सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं आपल्या पतीसाठी सुंदर नोट लिहिली आहे.

Mouni roy
मौनी रॉय (Mouni roy -instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 12:00 PM IST

मुंबई - Mouni roy : बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय अनेक हिट शोमध्ये दिसली आहे. मौनी फक्त तिच्या चित्रपटामुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असते. अलीकडेच तिनं तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात ती आपल्या पतीबरोबर दिसत आहे. तिनं शेअर केले हे फोटो आता तिच्या चाहत्यांना देखील आवडत आहेत. मौनीनं शेअर केलेल्या फोटोंवरुण नजर हटवणे चाहत्यांसाठी कठीण झालंय. मौनी रॉयनं 9 ऑगस्ट रोजी पती सूरज नांबियारचा वाढदिवस साजरा केला. तिनं आपल्या पतीला सोशल मीडियाच्या माध्यामातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मौननं शेअर केलेल्या फोटोत दोघेही खूप खुश दिसत आहेत.

मौनी रॉयनं शेअर केले पतीबरोबरचे फोटो : मौनीनं तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आपल्या पतीसाठी लिहिलं, "मला माझ्या जीवनामध्ये तू परीकथाप्रमाणे वास्तविकता दिली. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझे वागणे मला आवडते. मी तुला भेटले, तेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस सुरू झाले. वाढदिवसाच्या शुभेच्छा बेबी. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे." 27 जानेवारी 2022 रोजी मौनी रॉयनं गोव्यात बॉयफ्रेंड सूरज नांबियारबरोबर लग्न केलं होतं. या दोघांची जोडी अनेकांना खूप आवडते. मौनी अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर पतीबरोबरचे सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

मौनी रॉयचं करिअर : दरम्यान मौनी रॉयबद्दल बोलायचं झालं तर तिनं आपल्या करिअरची सुरुवात 2006 मध्ये एकता कपूरचा फॅमिली ड्रामा 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' मधून केली होती. या मालिकेत तिनं कृष्णा तुलसीची भूमिका साकारली होती. या भूमिकेनंतर ती प्रसिद्धझोतात आली होती. यानंतर तिनं 'जरा नचके देखा' या शोमध्ये भाग घेतला होता. तसेच तिला 'नागिन' मालिकेनंतर खूप प्रसिद्धी मिळाली. तिनं चित्रपटसृष्टीत 'हिरो हिटलर इन लव्ह' (2011) या पंजाबी रोमँटिक चित्रपटाद्वारे पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये 2018 'गोल्ड'द्वारे पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण नामांकनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

हेही वाचा :

  1. विक्रांत मॅसी स्टारर 'ब्लॅकआउट' टीझर रिलीज, पाहा व्हिडिओ... - Vikrant massey and mouni roy
  2. नागीणच्या भूमिकेनं लोकप्रिय ठरलेल्या मौनी रॉयचे पाहा हॉट लूकमधील फोटो
  3. मौनी रॉय आणि सूरज नांबियारनं लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्यानिमित्त शेअर केला सुंदर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.