ETV Bharat / entertainment

ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारादरम्यान हिना खाननं वर्कआउटचा व्हिडिओ केला शेअर - Hina Khan - HINA KHAN

Hina Khan : हिना खान ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारादरम्यान इंस्टाग्रामवर वर्कआउटचा व्हिडिओ शेअर केला आहे. आता तिचे चाहते तिच्या हिंम्मतबद्दल कौतुक करत आहेत.

Hina Khan
हिना खान ((Hina Khan - instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 3:30 PM IST

मुंबई - Hina Khan : टेलिव्हिजन जगतातील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक हिना खानला स्तनाचा कर्करोग स्टेज 3 असल्याचं निदान झाल्यानंतर, सतत चर्चेत आहे. हिना खानवर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हिना अनेकदा सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजनं त्रस्त असलेल्या हिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर आता एक वर्कआउटचा व्हिडिओ शेअर करून सर्वांना आश्चर्यचकित केलंय. उपचारादरम्यान शूटिंग सुरू केल्यानंतर तिनं आता पूर्वीप्रमाणे जिममध्ये फिटनेसवर काम सुरू केलंय. जिममध्ये अशा प्रकारे घाम गाळताना आणि तिच्या धाडसाचे अनेकजण कौतुक करत आहे.

हिना खानचा कॅन्सरशी लढा : हिना खाननं शेअर केलेल्या व्हिडिओत ती गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि काळी पॅन्टमध्ये दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं की, "एकावेळी एक पाऊल जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मी स्वतःला जे वचन दिले होते ते मी करत आहे. मी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही आनंदी राहू शकता. हे चार दिवस आनंदाचे असू द्या... मला इतकं बळ दिल्याबद्दल अल्लाहचे आभार. या आजाराविरुद्धची लढाई जिंकणाऱ्या सर्वांना सलाम. आपला स्वतःचा मार्ग शोधा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या." आता या पोस्टवर अनेक चाहते कमेंट्स करून तिला काळजी घेण्यास सांगत आहेत. तिचे चाहते तिला आता हिम्मत देताना दिसत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "तू लवकरच बरी होणार आहे, हिंम्मत हारू नको." दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, "तुझा मी खूप मोठा चाहता आहे, तू काळजी घे."

हिना खानला पाहून चाहते झाले भावूक : हिना खाननं काही काळापूर्वी कॅन्सरवर उपचार सुरू केले होते. केमोथेरपीच्या पहिल्या सत्रानंतरच ती कामावर परतली आहे. लेटेस्ट वर्कआउट व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक अक्षराचे खूप कौतुक करत आहेत. हिनाचा हा व्हिडिओ पाहून अनेकजण भावूक होत आहेत. दरम्यान हिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं ती शेवटी 'कंट्री ऑफ ब्लाइंड' या चित्रपटामध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालनं इन्स्टाग्रामवर हिना खानचा लेटेस्ट फोटो केला शेअर - hina khan
  2. ब्रेस्ट कॅन्सरच्या लढाईत शक्ती मिळावी यासाठी हिना खाननं केली 'अल्लाह'ला प्रार्थना - Hina Khan
  3. टीव्ही अभिनेत्री हिना खाननं केमोथेरपीनंतर कापले केस, केली भावनिक पोस्ट शेअर - HINA KHAN HAIR CUT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.