ETV Bharat / entertainment

अर्जुन कपूरचा नवा टॅटू 'रब राखा', आईची आठवण करून मानले आभार... - ARJUN KAPOOR SHARE PICS

अर्जुन कपूरनं त्याच्या पाठेवर एक नवीन टॅटू काढला आहे. यानंतर त्यानं आईला आठवण करत यावर एक भावनिक नोट लिहिली आहे.

arjun kapoor
अर्जुन कपूर (अर्जुन कपूर (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 21, 2024, 3:24 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर सध्या त्याचा नवीन चित्रपट 'सिंघम अगेन'च्या यशाचा आनंद घेत आहे. गुरुवारी 21 नोव्हेंबर रोजी त्यानं सोशल मीडियावर त्याच्या नवीन टॅटूचे फोटो शेअर केले आहेत. यावर त्यानं कॅप्शनमध्ये एक भावनिक नोट लिहिली आहे. अर्जुन कपूरनं ही पोस्ट त्याच्या आईला समर्पित केली आहे. अर्जुन कपूच्या लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्टनं त्याचे चाहते देखील भावूक झाले आहेत. अर्जुननं त्याच्या पाठीवर 'रब राखा' टॅटू गोंदवला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अर्जुन हा टॅटू काढताना दिसत आहे. हे फोटो शेअर करताना अर्जुनला दिवंगत आईची आठवण आली आहे.

अर्जुन कपूरचा नवीन टॅटू : अर्जुन कपूरनं पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'रब राखा - देव तुमच्यासोबत असो. चांगल्या आणि वाईट काळात माझी आई नेहमी हेच म्हणायची. आजही ती माझ्याबरोबर आहे, मला मार्गदर्शन करत आहे. मला असं वाटतं की, ती माझ्याकडे बघत आहे. 'सिंघम अगेन' रिलीज होण्याआधी मला हा टॅटू मिळाला आणि आता मी या नवीन अध्यायाच्या उंबरठ्यावर उभा असताना मला असं वाटतं आहे की, ती मला साथ देत आहे, मला तिची आठवण करून देण्यासाठी युनिव्हर्सनं एक योजना बनवली आहे. धन्यवाद आई, मला विश्वास शिकवण्यासाठी, रब राखा.'

अर्जुनच्या पोस्टवर परिणीती चोप्राची प्रतिक्रिया : अर्जुननं पोस्ट करताच यावर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. पोस्टवर प्रतिक्रिया देताना, बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानं रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. बी-टाऊनचे प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट अलीम हकीमनेही या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अर्जुनच्या लूकचे कौतुक करताना एका चाहत्यानं लिहिलं, 'सर, तुमचा लूक फायर आहे'. आणखी एका चाहत्यानं लिहिलं, 'भाऊ, तुला खूप बळ मिळो. विश्व तुमच्या पाठीशी आहे.' दरम्यान अर्जुन कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो रोहित शेट्टीच्या सुपरहिट कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन' आहे. या चित्रपटात त्यानं खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'सिंघम अगेन' चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग , अक्षय कुमार, आणि टायगर श्रॉफ यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. मलायका अरोराच्या क्रिप्टिक पोस्टनंतर, अर्जुन कपूरनं स्वत:ला सिंगल म्हणून ब्रेकअपची केली पुष्टी
  2. मलायका अरोराच्या वडिलांच्या आत्महत्येनंतर अर्जुन कपूर मलायकाच्या पाठिशी खंबीर - arjun kapoor
  3. कोलकाता बलात्कार खून प्रकरणानंतर अर्जुन कपूरनं रक्षाबंधननिमित्त पुरुषांना दिला संदेश - Raksha Bandhan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.