ETV Bharat / entertainment

अभिषेक बच्चन पापाराझींसमोर हात जोडून म्हणाला - 'बस्स, भाऊ', वाचा काय आहे प्रकरण... - NIMRAT KAUR ABHISHEK BACHCHAN

अभिषेक बच्चननं मुंबई विमानतळावर पापाराझींना हात जोडून 'बस्स, भाऊ.' म्हटलं. सध्या अभिषेक अभिनेत्री निम्रत कौरमुळे चर्चेत आहे.

abhishek bachchan
अभिषेक बच्चन (अभिषेक बच्चन (IANS))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 22, 2024, 11:56 AM IST

मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिषेक बच्चनचं नाव 'दसवीं पास' चित्रपटामधील सहअभिनेत्री निम्रत कौरबरोबर सध्या जोडलं जात आहे. दरम्यान, अभिषेक बच्चन मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. त्यावेळी, पापाराझींनी अभिषेकवर कॅमेरे फोकस केला, यानंतर त्यानं चिंतित होऊन पापाराझींसमोर हात जोडले. अभिषेक त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता बंटी वालियाबरोबर यावेळी होता. विमातळावर अभिषेक हा खूप डिस्टर्ब असल्याचा दिसला.

अभिषेक बच्चननं पापाराझींना जोडले हात : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी त्यानं निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि बेज रंगाची पँट घातली होती. व्हिडिओत तो त्याच्या कारच्या दिशेनं जात होता, यावेळी पापाराझींनी त्याचा पाठलाग केला. यानंतर अभिषेक बच्चननं पापाराझींना हात जोडून 'बस्स, भाऊ.' धन्यवाद' असं म्हटलं. यादरम्यान अभिषेक हा पापाराझींबरोबर फोटो काढण्यासाठीही थांबला नाही. याशिवाय यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसूही दिसले नाही. यापूर्वी अभिषेक बच्चन त्याची आई जया बच्चनबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. यावेळी अभिषेकची बहीण श्वेता बच्चनही तिथे उपस्थित होती. याठिकाणी देखील अभिषेक पापाराझींकडे न पाहता हात जोडून निघून गेला होता.

अभिषेक बच्चन आणि निम्रत कौर यांच्या कथित नात्याबद्दल चर्चा : दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्सही करत आहेत. एका यूजरनं यावर लिहिलं की, 'जया बच्चन आणि तिची मुलगी श्वेतानं बेरोजगार अभिषेक बच्चनला ऐश्वर्यापासून वेगळे केले.' याशिवाय अनेक यूजर्सनी अभिषेकच्या या लूकवर त्याला ट्रोल देखील केलं आहे. आजकाल अभिषेक बच्चन आणि निम्रत कौरच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर जोर धरत आहेत. याबद्दल दोन्ही स्टार्सकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र अनेकजण हे दोघेही एकत्र असल्याचा दावा करत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघेही अनेक दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसत नाही. याशिवाय दोघेही वेगळे राहत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. यानंतर अनेकजण हे दोघेही घटस्फोट घेणार असल्याचा अंदाज लावत आहे.

हेही वाचा :

  1. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या अफवादरम्यान स्टार कपलचा एन्जॉय करतानाचा व्हिडिओ व्हायरल
  2. आंतरराष्ट्रीय कन्या दिनानिमित्त अभिषेक बच्चन स्टारर 'बी हॅप्पी'चं पहिलं पोस्टर रिलीज - Abhishek Bachchan
  3. 'आयुष्य कधीच सोपं नसतं' म्हणत अमिताभ बच्चननं लिहिली गूढ पोस्ट - Amitabh Bachchan share cryptic post

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.