मुंबई - Abhishek Bachchan : बॉलिवूडच्या स्टार कपलपैकी एक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काही ठीक नसल्याचं दिसत आहे. नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात अभिषेक आणि ऐश्वर्या एकेकटे दिसले होते. आता अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या पोस्टला लाईक करून लोकांना अधिक कंड्या पिकवायला भाग पाडलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिषेकनं अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यानंतर असं काही केलं आहे, ज्यामुळे आता सोशल मीडियावर त्याच्या नात्याबद्दल एक नवीन अंदाज बांधला जात आहे. आता सोशल मीडियावर यांच्या घटस्फोटाबद्दल चर्चा होत असून अनेकजण ऐश्वर्याला पाठिंबा देताना दिसत आहेत.
अभिषेक बच्चननं लाईक केली घटस्फोटाशी संबंधित पोस्ट : अभिषेकनं लाईक केलेली ही पोस्ट आता खूप चर्चेत आहे. ही पोस्ट लेखिका हीना खंडेलवाल यांनी शेअर केली होती. यावर अभिषेकनं लाईक बटण दाबले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, "जेव्हा प्रेम करणे सोपे होते. ज्या जोडप्यांनी लग्न केले आहे आणि आता वेगळे होत आहेत. त्यांना हे निर्णय घेण्यास कशामुळे प्रवृत्त केले आणि ग्रे घटस्फोट का वाढत आहेत?" यानंतर त्यांनी पुढं लिहिलं, "घटस्फोट घेणं सोपं नाही, आता कोणाला सुखानं जगण्याचे स्वप्न पहायचे नाही, वृद्धापकाळात जोडीदाराचा हात धरून रस्ता ओलांडण्याची कल्पना कोण करत नाही? आयुष्य आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध निघालं, पण सर्व काही ठीक दिसत असतानाही जर नातं तुटायला लागलं तर आपल्याला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं? हे अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकते, 'ग्रे घटस्फोट' आणि 'सिल्व्हर स्प्लिटर' (50 वर्षांनंतर घटस्फोट घेणारे लोक) संख्या वाढत आहे."
अभिषेकच्या ऐश्वर्या नात्यात दुरावा : अभिषेकने ही पोस्ट लाईक केल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. घटस्फोटाच्या पोस्टला लाईक केल्यानंतर सर्वत्र युजर्स अभिषेक आणि ऐशच्या विभक्त होण्याचे अंदाज बांधत आहेत. आता अनेकदा ऐश्वर्या आपल्या पतीबरोबर कमी आणि मुलगी आराध्या बरोबर जास्त ठिकणी दिसते. अनेकदा माय-लेकी एकत्र कुठेही जाताना दिसतात. ऐश्वर्याची बॉडिंग आपल्या मुलीबरोबर खूप चांगली आहे.
हेही वाचा :
- ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चननं 17 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला कौटुंबीक फोटो - Aishwarya Rai and Abhishek Bachchan
- ऐश्वर्या राय बच्चनची मुलगी आराध्या वयाच्या 13 व्या वर्षी झाली समजूतदार, पापाराझीला म्हटली 'ही' गोष्ट - AISHWARYA RAI
- अनंत-राधिकाच्या लग्नात ऐश्वर्या रायनं बच्चन कुटुंबासह येणं टाळलं, पुन्हा नव्या अटकळांना चालना - Aishwarya Rai Bachchan