ETV Bharat / entertainment

बिग बींचा 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर पाहून अभिषेक बच्चननं म्हटलं 'माइंडब्लोइंग' - KALKI 2898 AD TRAILER

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 11:20 AM IST

Updated : Jun 11, 2024, 2:40 PM IST

KALKI 2898 AD TRAILER : 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलरची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणावर केली जात होती. काल संध्याकाळी ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर याचा ट्रेंड सुरू झाला. ट्रेलर पाहून अभिषेक बच्चननंही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Kalki 2898 AD trailer
कल्की 2898 एडी (ANI)

मुंबई - KALKI 2898 AD TRAILER : बहुप्रतीक्षित 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहते आणि समीक्षकांनी अमिताभ बच्चन आणि इतर कलाकारांची प्रशंसा केली आहे. यादरम्यान बिग बींचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चननं आपली प्रतिक्रिया शेअर केली आहे.

सोमवारी इंस्टाग्रामवर अभिषेकनं चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आणि लिहिलं, "माइंडब्लोइंग!!!!कल्की 2898 एडी."

अमिताभ, दीपिका पदुकोण आणि प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'चा ट्रेलर सोमवारी संध्याकाळी रिलीज झाल्यापासून ट्रेंडमध्ये आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा पोस्ट-अपोकॅलिप्टिक चित्रपट हिंदू धर्मग्रंथांवर आधारित असून सन 2898 एडी मध्ये सेट केलेला आहे. ट्रेलरमध्ये असं दिसतं की, दिग्दर्शक अश्विननं भविष्यकालीन लेन्समधून महाभारताची पुनर्कल्पना केली आहे आणि त्यात डायस्टोपियन टच जोडला आहे. कमल हासन आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

ट्रेलरच्या आधी निर्मात्यांनी दीपिका पदुकोणचं एक पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर ती खूपच इन्टेन्स दिसत आहे. 'कल्की' चित्रपटाचे निर्माते सतत नवनवीन पोस्टरसह इतर प्रमोशनल सामुग्री रिलीज करुन प्रेक्षकांची उत्कंठा सातत्यानं वाढवत आले आहेत. गेल्या महिन्यात निर्मात्यांनी कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यादरम्यान साय-फाय डायस्टोपियन चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या लुकचा टीझर शेअर केला होता.

या 21 सेकंदाच्या टीझरची सुरुवात बिग बी एका गुहेत बसून शिवलिंगाची प्रार्थना करण्यात मग्न दिसतात. एका छोट्या क्लिपमध्ये, एक लहान मुलगा बिग बींना विचारतो की, 'क्या तुम भगवान हो, क्या तुम मर नहीं सकता? तुम भगवान हो? कौन हो तुम? यावर बच्चन उत्तर देतात, "द्वापर युग से दश अवतार की प्रतीक्षा कर रहा हूँ मैं, द्रोणाचार्य का पुत्र अश्वत्थामा."

हा चित्रपट 27 जूनला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. दरम्यान, वर्क फ्रंटवर अभिषेक 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, अनिल कपूर, नाना पाटेकर, रितेश देशमुख आणि चंकी पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

फोन हिसकावून पापाराझीच्या गर्लफ्रेंडशी वरुण धवननं मारल्या गप्पा, पाहा धमाल व्हायरल व्हिडिओ - Varun dhawan

एमसीएचे अध्यक्ष अमोल काळेंच्या निधनाचा सोनू सूदसह अनेकांना धक्का - Amol Kale pass away

अभिनेत्री मलाबिकाच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टनं केले अंत्यसंस्कार, मृत्यूचे नेमके कारण काय? - Actress Noor Malabika Death

Last Updated : Jun 11, 2024, 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.