ETV Bharat / entertainment

'आशिकी' फेम अभिनेत्री अनु अग्रवालला बॉलिवूडमध्ये करायचं आहे कमबॅक - aashiqui fame anu aggarwal

Anu Aggarwal : अनु अग्रवालला हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करायचा आहे. तिनं आता निर्माते आणि दिग्दर्शकांकडे अभिनयाचं काम मागितलं आहे.

Anu Aggarwal
अनु अग्रवाल ((Anu Aggarwal -instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 5:31 PM IST

मुंबई - Anu Aggarwal : 'आशिकी' फेम अनु अग्रवाल अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. काही चाहत्यांच्या मनात एक प्रश्न अजूनही कायम आहे की, ती आतापर्यत चित्रपटामध्ये का दिसली नाही. दरम्यान अनु अग्रवाल आणि राहुल रॉय स्टारर 'आशिकी' हा चित्रपट खूप हिट झाला होता. यानंतर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल रातोरात स्टार बनले होते. त्यानंतर अनुनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. मात्र ती प्रेक्षकांमध्ये आपली जादू दाखवू शकली नाही. यानंतर अनु अग्रवालच्या आयुष्यात एक वेगळे वळण आलं. 1999 मध्ये अनु अग्रवाल रोड अपघाताची शिकार झाली. या अपघातात अनू अग्रवालनं तिची अनेक वर्षाची प्रसिद्धी गमावली. या अपघातानंतर ती जवळपास महिनाभर कोमात राहिली.

अनु अग्रवाल झाला होता रोड अपघात : अनुवर जवळपास 3 वर्षे उपचार सुरू होते. यानंतर ती काही वर्षानंतर बरी झाली, मात्र या अपघातात तिचा चेहरा खूपच विद्रूप झाला. अनुचा चेहरा इतका खराब झाला होता की, तिचा चेहरा देखील ओळखणे कठीण झाले होते. तेव्हापासून अनु फिल्मी जगापासून दूर राहिली. आता तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतायचे आहे. अनु अग्रवालनं एका मुलाखतीत सांगितलं की, तिला चित्रपटसृष्टीत परतायचे आहे. तिनं आता बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांना अभिनयाचं काम मागितलं आहे. अनुला जेव्हा विचारण्यात आलं की ती बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी किती प्रयत्न करत आहे यावर तिनं म्हटलं, "मला सर्व चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना काम मागायचे आहे. तुम्ही माझ्याशी इन्स्टाग्रामवरही संपर्क साधू शकता. मी चित्रपट आणि ओटीटीवर काम करण्यासाठी उत्सुक आहे."

'आशिकी' चित्रपटाबद्दल : हा चित्रपट 1990 साली रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं होतं. 'आशिकी' चित्रपटात राहुल रॉय आणि अनु अग्रवाल व्यतिरिक्त दीपक तिजोरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. 'आशिकी' चित्रपटामधील गाणी खूप हिट झाली होती. या चित्रपटामध्ये अनु अग्रवाल आणि राहुल रॉयची जोडी अनेकांना आवडली होती.

हेही वाचा :

  1. 'काटा लगा' गर्ल शेफाली जरीवालानं उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात केली प्रार्थना, फोटो व्हायरल - shefali jariwala
  2. करण जोहरनं 'चंदू चॅम्पियन'चा ट्रेलर शेअर करून केलं कार्तिक आर्यनचं कौतुक - kartik aryan
  3. "मतदान न करणाऱ्यांना शिक्षा व्हावी", परेश रावलची प्रतिक्रिया: दिग्गज सेलेब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.