ETV Bharat / entertainment

आमिर खानचा मुलगा जुनैदच्या 'महाराज' चित्रपट रिलीजवर कोर्टानं घातली बंदी, जाणून घ्या कारण? - Maharaj

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 3:42 PM IST

Maharaj release ban : आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या बॉलिवूड पदार्पणाच्या चित्रपटाला मोठं ग्रहण लागलं आहे. आज 14 जून रोजी जुनैदचा बॉलिवूड डेब्यू चित्रपट 'महाराज' रिलीज होणार होता. परंतु, त्यापूर्वीच कोर्टानं त्याच्या रिलीजवर बंदी घातली. कारण जाणून घेण्यासाठी वाचा...

Maharaj release ban
महाराज रिलीजवर बंदी (Maharaj Poster Instagram)

मुंबई - Maharaj release ban : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा मुलगा जुनैद खान आज 'महाराज' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. 'महाराज' हा चित्रपट आज 14 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शनासाठी तयार होता. दरम्यान या चित्रपटावर गुजरात उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. 'महाराज' चित्रपटावर हिंदू आणि सनातन धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप आहे. या चित्रपटात आमिर खानचा मुलगा जुनैद खाननं एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे.

या चित्रपटाच्या कथानकावरुन विश्व हिंदू परिषदेने याआधीच आपला आक्षेप व्यक्त केला असून त्यानंतर या चित्रपटाचं प्रमोशन न करता, अगदी ट्रेलरही रिलीज न करता थेट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शन करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता. अशातच प्रदर्शना आधीच गुजरात उच्च न्यायालयाने त्याच्या दाखवण्यावर बंदी घातली आहे.

विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत बजरंग दलानं एका निवेदनात म्हटलं आहे की, "यशराज फिल्म्सचा 'महाराज' हा चित्रपट 14 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याचं सोशल मीडियावरून समोर आलं आहे. चित्रपटात मुख्य अभिनेता जुनैद खान आहे आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं पोस्टर पाहता एका हिंदू धर्मगुरूला खलनायक दाखवण्यात आलं आहे."

निवेदनात पुढे लिहिले आहे की, "चित्रपटात श्रीकृष्णावरही अशोभनीय कमेंट करण्यात आल्याचं आम्हाला कळलं आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सनातन आणि हिंदू धर्माला कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा चित्रपट 140 वर्ष जुन्या न्यायालयीन खटल्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे, तो काळ ब्रिटिशांचा होता, ज्यांना हिंदू धर्म तोडायचा होता. आज 140 नंतर वर्षानुवर्षे हिंदू धर्माचा अपमान करण्याचा हतबल प्रयत्न केला जात आहे."

पुढे लिहिले आहे की, "हिंदूंच्या भावना दुखावण्याच्या उद्देशानं हा चित्रपट बनवण्यात आला असून हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण विश्व हिंदू परिषद आणि संत समाजाच्या शिष्टमंडळाला याची माहिती द्यावी अशी आमची मागणी आहे. हा चित्रपट दाखवा, त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ", असं निवेदनात म्हटलंय.

महाराज या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी केले असून यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला होता. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी १८ जून रोजी होणार आहे. त्यामुळे आमिर खानच्या मुलाला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा -

  1. सुशांत सिंह राजपूतचा आज चौथा स्मृतिदिन; बहिणीनं पोस्ट करत केली 'ही' विनंती - Sushant Singh Rajput
  2. केतकी चितळेची महायुती सरकारवर आगपाखड; वक्फ बोर्डाच्या मदतीवर आक्षेप - Ketaki Chitale aggressive video
  3. करण जोहरला दिलासा; 'शादी के डायरेक्टर करण और जोहर' चित्रपटाच्या प्रदर्शनाला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती - Karan Johar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.