ETV Bharat / entertainment

आमिर खाननं राज पंडित यांंच्या 'कुडिए' गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये जुनैद खानची केली प्रशंसा - Aamir Khan Praises Junaid Khan

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 6:28 PM IST

Aamir Khan Praises Junaid Khan: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खाननं त्याचा मुलगा जुनैद खानचं कौतुक केलं आहे. आमिरनं राज पंडित यांच्या 'कुडिए' गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये जुनैदच्या 'महाराज' चित्रपटाबद्दल आपलं मत व्यक्त केलं.

Aamir Khan About Son Junaid Khan
आमिर खान मुलगा जुनैद खान बद्दल (आमिर खान (IANS))

मुंबई - Aamir Khan Praises Junaid Khan: आमिर खाननं नुकतेच राज पंडित यांच्या 'कुडिए ' या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटला हजेरी लावली. या कार्यक्रमात त्याने आपला मुलगा जुनैद आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल मत व्यक्त केलं. लॉन्चिंग इव्हेंटमध्ये आमिर खाननं राज पंडित यांचं 'कुडिए' गाण्यासाठी त्यांचं अभिनंदन केलं. त्यानं राज आणि त्यांच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आमिरनं मुलगा जुनैद आणि त्यांचा पहिला चित्रपट 'महाराज'चं कौतुक केलं. आमिर म्हणाला, "मला जुनैदचा खूप अभिमान वाटतो, मला सांगताना आनंद होत आहे की जुनैदनं स्वत:च्या मेहनतीनं आपला मार्ग बनवला आहे. मी तुम्हाला हे देखील सांगू इच्छितो की, त्यानं माझ्याकडून कधीही मदत घेतली नाही."

आमिर खान मुलगा जुनैद खान बद्दल बोलताना (आमिर खान (ETV Bharat))

आमिर खाननं केलं आपल्या मुलाचं कौतुक : यानंतर आमिरनं पुढं म्हटलं की, जुनैदनं खूप मेहनती आहे, तो स्वत:च्या अटींवर काम करत आहे आणि पुढे जात आहे, याचा मला आनंद आहे. जुनैदचा 'महाराज' हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मी खूप नर्वस होतो की, लोकांना त्याचं काम आवडेल की नाही, यामुळे मला खूप ताण आला होता. जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदाच कोणतेही काम सुरू करते, तेव्हा थोडी चिंता आणि ताण येतो. जुनैदचा 'महाराज' हा चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. त्याचा हा चित्रपट अनेकांना आवडला आहे.

आमिर खानचा 'लापता लेडीज' : दरम्यान आमिर खानबद्दल बोलायचं झालं तर त्यानं पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावबरोबर 'लापता लेडीज' चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाला होता. अनेकांनी या चित्रपटाला पसंत केलं आहे. या चित्रपटामध्ये नितांशी गोयल, प्रतिभा राणाता, स्पर्श श्रीवास्तव, रवि किशन, छाया कदम आणि सतेंद्र सोनी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले आहेत. आता आमिरच्या आगमी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'लाहोर 1947 'मध्ये सनी देओल बरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपट दिग्दर्शन राजकुमार संतोषी करणार आहे.

हेही वाचा :

  1. आमिरचा मुलगा ओटीटी पदार्पणासाठी सज्ज, जाणून घ्या जुनेद खानचा 'महाराजा' कधी आणि कुठे होणार रिलीज - Junaid Khan OTT debut
  2. आमिर खानचा मुलगा जुनैदनं 'महाराज' चित्रपटातून केलं पदार्पण, बहीण इरा आणि मेव्हणा नुपूरची प्रतिक्रिया - Maharaj release
  3. पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्तानं कानशीलात का लगावली? आमिरनं कपिल शर्माच्या शोमध्ये सांगितलं कारण - aamir khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.