मुंबई Ira Khan-Nupur Sikhare Unseen Pics : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खाननं उदयपूरमध्ये बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान आयरानं या लग्नामधील काही सुंदर फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. आयरा आणि नुपूरच्या लग्नातील फोटो खूप सुंदर आहेत. हे फोटो शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ''आम्ही सर्वकाही चांगलं केलं.'' या फोटोमध्ये संपूर्ण कुटुंब खूप आनंदी दिसत आहेत. आयरानं शेअर केलेल्या फोटोवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.
आयरानं लग्नातील फोटो केले शेअर : या फोटोमध्ये आमिर खानच्या पूर्वश्रमीच्या दोन्ही पत्नी लग्नाचा आनंद घेताना दिसत आहेत. फोटोच्या फ्रेममध्ये आयरा आणि नुपूर मध्यभागी असून त्याच्या बाजूला किरण राव, आमिर खान, रीना दत्ता आझाद आणि चुलत बहीण चेरी, नुपूरची आई आहेत. या फोटोमध्ये आमिर खान हा सूटमध्ये दिसत आहे. याशिवाय आमिर खानची लाडकी मुलगी ही ब्लॅक ट्यूब नेक ड्रेसमध्ये तर नुपूर शिखरे ब्लॅक सूटमध्ये आहे. मुंबईत नोंदणी विवाह केल्यानंतर या जोडप्यानं राजस्थानच्या उदयपूरमध्ये भव्य विवाह केला. यानंतर त्यांनी मुंबईत एक भव्य रिसेप्शन दिलं, ज्यामध्ये शाहरुख खान-गौरी खान, कंगना राणौत यांच्यासह फिल्म इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स उपस्थित होते.
इरा आणि नुपूर यांची भेट कशी झाली : रिसेप्शननंतर नवविवाहित जोडपे आता इंडोनेशियातील बाली येथे हनीमूनवर आहे. त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये आयरा आणि नुपूर फ्लाईटमध्ये बसून ज्यूस पिताना दिसत होते. नुपूर आणि आयरा कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान भेटले होते. या काळात नुपूर आमिर खानला फिट राहण्यासाठी प्रशिक्षण देत होता. यावेळी आयरा ही तिच्या वडिलांसोबत राहात होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांनी साखरपुडा केला होता. या पार्टीमधील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हेही वाचा :