ETV Bharat / entertainment

आमिर खानची मुलगी आयरा खान पती नुपूर शिखरेसोबत गेली हनीमूनला ; फोटो केले शेअर - हनीमून

Ira-Nupur Honeymoon :आमिर खानची मुलगी आयरा खाननं पती नुपूर शिखरेसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे जोडपं हनीमूनसाठी इंडोनेशियामध्ये गेले आहेत.

Ira-Nupur Honeymoon
आयरा - नुपूर हनीमून
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 1:27 PM IST

Updated : Jan 20, 2024, 6:19 PM IST

मुंबई - Ira-Nupur Honeymoon : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खाननं नुकतंच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न केलं. या जोडप्यानं यापूर्वी मुंबईत कोर्ट मॅरेज केलं होतं. यानंतर आयरा आणि नुपूरनं जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं. आमिर खाननं 13 जानेवारीला मुंबईत आपल्या मुलीच्या ग्रँड रिसेप्शन पार्टीचे आयोजन केलं होतं. आता हे नवविवाहित जोडपे त्यांच्या हनिमूनसाठी रवाना झाले. आयरानं तिच्या सोशल मीडिया हँडलवर काही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये हे जोडपं खूप आनंदी दिसत आहे. शेअर केलेल्या फोटोंबद्दल तिनं कॅप्शनमध्ये लिहीलं, ती आणि नुपूर जात आहेत आणि त्यांनी एकत्र इमिग्रेशन लाइन पार केली आहे.

आयरा खान आणि नुपूर शिखरे हनीमूनसाठी कुठे गेले : लग्नाचे अनेक दिवस सेलिब्रेशन केल्यानंतर आयरा खान आणि नुपूर शिखरे त्यांच्या हनीमूनसाठी बाली येथे पोहोचले आहे. आयरानं शेअर केलेल्या एका फोटोमध्ये ती एअरपोर्ट लाउंजमध्ये सेल्फी काढताना दिसत आहे. दुसर्‍या फोटोत हे जोडपं विमानात ऑरेंज ज्यूस पिताना दिसत आहे. या प्रवासादरम्यान आयरानं राखाडी रंगाच्या टॉपवर ग्रे जॅकेट घातलेलं आहे, तर नुपूरनं निळ्या रंगाच्या गंजीवर काळ्या रंगाचं जॅकेट घातलं आहे. या फोटोंमध्ये हे जोडपं खूप सुंदर दिसत आहे. आयरानं नुपूरसोबतचे विमानतळावरील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

आयरा- नुपूरचं लग्न : आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी आयरा खाननं बुधवारी, 10 जानेवारी रोजी उदयपूरमध्ये बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत ख्रिश्चन पद्धतीने लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. यापूर्वी या जोडप्यानं 3 जानेवारीला मुंबईत नोंदणीकृत विवाह केला होता. आयरा आणि नुपूरच्या लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले होते. आयरा आणि नुपूर वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आयरा खान ही अगात्सू फाउंडेशनची संस्थापक आणि सीईओ आहे, जी मानसिक आरोग्य मदतीसाठी समर्पित संस्था आहे. दुसरीकडे नुपूर शिखरे हा फिटनेस कोच, सल्लागार आणि अ‍ॅथलीट आहे. लॉकडाउनदरम्यान नुपूर आणि आयराची प्रेमकहाणी सुरू झाली होती.

हेही वाचा :

  1. सुहाना खानने पार पाडले बहिणीचं कर्तव्य! छोट्या भावासाठी बनली चीअरलीडर
  2. 'फायटर'च्या ट्रेलरवर पाकिस्तानी सेलिब्रिटींची टीका, सिद्धार्थ आनंदने दिले प्रत्युत्तर
  3. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी जॅकी श्रॉफने साफ केले मुंबईतील सर्वात जुने राम मंदिर

Last Updated : Jan 20, 2024, 6:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.