मुंबई - Aamir Khan birthday : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आज 14 मार्च रोजी 59वा वाढदिवस साजरा करत आहे. आता या विशेष प्रसंगी आमिर खानचे चाहते त्याच्या फॅन पेजवर त्याचे फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आमिर खान सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांशी कनेक्ट होणार आहे. दरम्यान आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावनं 'लापता लेडीज' टीम मीडियाबरोबर त्याच्या 59 व्या वाढदिवसाचा केक कापला आहे. आमिर खानच्या वाढदिवसाचा केक कापतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमिर खानचा वाढदिवस : या व्हिडिओमध्ये आमिर खान ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लू डेनिममध्ये दिसत आहे. आमिरच्या समोर लाकडी टेबलावर एक मोठा तपकिरी केक ठेवला आहे. याशिवाय आमिर जेव्हा केक कट करतो, तेव्हा तेथील उपस्थित असणारे सर्वजण त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. आमिर खान आणि किरण राव सध्या 'लापता लेडीज'मुळे चर्चेत आहे. दरम्यान सलमान खाननेही या चित्रपटाचे खूप कौतुक केले असून त्यानं एक पोस्ट देखील किरण रावसाठी शेअर केली आहे. सलमान पोस्टद्वारे किरणबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप, जेनेलिया डिसूझा, हिमेश रेशमिया, प्रिया बापट, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, मुनावर फारुकी, अभिनेता वीर दास, करण जोहर आणि शबाना आझमी यांनीही या चित्रपटाचे कौतुक केले आहेत.
आमिर खानचे आगामी चित्रपट : 'लापता लेडीज' 1 मार्च रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटाची कहाणी एका व्यक्तीवर आहे जो लग्न करून आपल्या पत्नीला घरी आणतो आणि वाटेतच त्याच्या पत्नीची दुसऱ्या वधूबरोबर अदलाबदल होते. आता आपल्या हरवलेल्या वधूला शोधण्याचा हा प्रवास खूपच मनोरंजकरित्या या चित्रपटामध्ये मांडला गेला आहे. दरम्यान आमिर खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो ' लाहोर 1947' आणि 'सितारे जमीन पर'मध्ये दिसणार आहे. 'सितारे जमीन पर'मध्ये त्याच्याबरोबर जेनेलिया डिसूझा देखील असणार आहे. आमिरचा हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :