ETV Bharat / entertainment

आलिया सिद्दीकी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्याला नात्याला दिली एक संधी - Aaliya and Nawazuddin - AALIYA AND NAWAZUDDIN

Aaliya Siddiqui and Nawazuddin siddiqui : आलिया सिद्दीकी आणि नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या नात्याला एक संधी दिली आहे. आलियानं दिलेल्या एका मुलाखतीत याबद्दल खुलासा केला आहे.

Aaliya Siddiqui and Nawazuddin siddiqui
आलिया सिद्दीकी आणि नवाजुद्दीन सिद्दीकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 28, 2024, 2:36 PM IST

मुंबई - Aaliya Siddiqui and Nawazuddin siddiqui : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आयुष्यात पुन्हा एकदा वसंत ऋतूचं आगमन होत आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या पत्नी आलिया सिद्दीकीबरोबरच्या वादात नवा ट्विस्ट आला आहे. नवाजुद्दीननं त्याच्या लग्नाचा चौदावा वाढदिवस पत्नीबरोबर साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीमधील काही फोटो आलिया सिद्दीकीनं सोशल मीडियावर शेअर केले होते. या जोडप्याच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये त्यांची मुले देखील उपस्थित होती. दरम्यान नवाजुद्दीन हा आपल्या कुटुंबाबरोबर राहणार असल्याचं समजत आहे. आलियानं दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, 'तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे नवाजुद्दीनबरोबरचे तिचे नाते बिघडले होते, मात्र आता ती तिचे आयुष्य तिच्या मुलांसाठी जगणार आहे.

आलिया सिद्दीकीनं दिली मुलाखत : नवाजुद्दीन आणि आलियाच्या घटस्फोटाचा आणि मुलांच्या कस्टडीचा खटला कोर्टात प्रलंबित आहे. आलियानं पुढं सांगितलं की, गेल्या काही दिवसांत आयुष्यात बदल झाले आहेत, मला वाटलं की जेव्हा जगाने आमचा वाद पाहिला, तेव्हा आमचं प्रेमही पाहायला हवं. मला वाटतं की आता चांगलं काहीतरी करण्याची वेळ आली आहे. कारण तिसऱ्या व्यक्तीमुळे आमचं नातं बिघडलं. गैरसममुळे आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण आता आम्ही आमच्या मुलांसाठी एकत्र येणार आहोत. आता आयुष्य वेगळं जगण्याचा पर्याय नाही, आमची मुले मोठी झाली आहेत आणि त्यांना आम्हा दोघांचीही सारखीच ओढ आहे. आमच्यामुळे आमची मुलं खूप दु:खी आहेत. त्यामुळे आमचा शेवटचा निर्णय आहे की, आम्ही आनंदानं एकत्र राहणार आहोत.

नवाजुद्दीन सिद्दीकी वर्कफ्रंट : आलियानं सोशल मीडियावर नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबाबाबत अनेक खुलासे केले होते. याशिवाय तिनं घटस्फोटाची केसही दाखल केली होती. ती मुलांबरोबर वेगळी राहू लागली होती. आता एका वर्षांनंतर दोघांनी पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला एक संधी देण्याचं ठरवलं आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलियानं त्यांच्या मुलांसाठी घटस्फोट मागे घेतला. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'सैंधव' या तेलुगू चित्रपटामध्ये दिसला होता. आता पुढं नवाजुद्दीन 'फ्राईट फ्लाइट', 'सेक्शन 108' आणि 'नूरानी चेहरा' या चित्रपटांमध्ये झळकणार आहेत. याशिवाय तो 'पवनपुत्र भाईजान'मध्ये सलमान खानबरोबर दिसेल.

हेही वाचा :

  1. श्रेयस तळपदे, विजय राज स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर 'कर्तम भुगतम'ची रिलीज तारीख जाहीर - Kartam Bhugtam
  2. आर्यन खान दिग्दर्शित 'स्टारडम' वेब सीरीजच्या शूटिंग सेटवरचा व्हिडिओ व्हायरल - Aaryan Khan and Stardom web series
  3. पाक अभिनेत्री सना जावेदनं पती शोएब मलिकबरोबर साजरा केला 31 वा वाढदिवस; फोटो व्हायरल - Sana celebrated her 31st birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.