मुंबई - shah rukh khan : बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानला नुकतेच स्वित्झर्लंडमधील लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये सम्मानित करण्यात आलं होतं. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल त्याला पारडो अल्ला कॅरीरा एस्कोना-लोकार्नो टूरिस्मो पुरस्कार देण्यात आला असून यादरम्यान शाहरुखनं, त्याच्या बहुप्रतीक्षित आगामी 'किंग' चित्रपटाची पुष्टी केली. त्यानं चित्रपटाविषयी एक रोमांचक माहितीही यावेळी शेअर केली. लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलदरम्यान किंग खाननं लाइव्ह सेशनमध्येही भाग घेतला होता. लाइव्ह सेशनमध्ये त्यानं प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी शाहरुखनं पुष्टी केली की, तो त्याचा आगामी चित्रपट सुजॉय घोषच्या 'किंग' चित्रपटासाठी काम करत आहे.
It's official
— Khushank Sanghvi (@khushanks2095) August 11, 2024
King has reveled his next film King
Truly a King in every essence be it as a actor, Producer, businessmen & as a family man
SRK IN LOCARNO pic.twitter.com/TUj1rVghYV
शाहरुखचा आगामी चित्रपट : शाहरुखनं असेही सांगितलं की, सुजॉय घोषच्या आगामी चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप ॲक्शन पाहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी तो खूप मेहनत घेत असून चित्रपटातील भूमिकेसाठी, तो वजनावरही काम करत आहे. आगामी चित्रपटाबद्दल माहिती देताना त्यानं म्हटलं, "ॲक्शन अवघड आहे, तुम्हाला त्याचा सराव करावा लागतो, ते शिकावे लागेल आणि काही धोकादायक स्टंट डबल्सही करावे लागतात. माझ्याकडे काही चांगले लोक आहेत, मात्र तुम्हाला काही प्रामाणिकपणे विकायचे असेल तर त्यासाठी 80 टक्के स्वत: काम करावे लागते. नाहीतर ते योग्य होत नाही." यानंतर 'किंग खान' गंमतीनं म्हणाला, "मी पडद्यावर छान दिसत असलो तरी शूटिंग करताना मला वेदना होतात, हे ग्लॅमरस नाही."
Shah Rukh Khan has officially announced his next film, KING with Sujoy Ghosh, an action-packed blockbuster. This is the biggest news of the day & we can't keep calm 👑🔥#King #ShahRukhKhan #Locarno77 pic.twitter.com/YrE9dACJPq
— Shah Rukh Khan Warriors FAN Club (@TeamSRKWarriors) August 11, 2024
'किंग'मध्ये दिसणार शाहरुख खान : यानंतर शाहरुखनं पुढं सांगितलं, "मी 'किंग' हा पुढचा चित्रपट करत आहे, मला माझ्या 'किंग' या चित्रपटावर काम सुरू करायचे आहे. मला थोडे वजन कमी करावे लागेल आणि थोडे स्ट्रेच करावे लागेल. जेणेकरुन मला ॲक्शन करताना माझ्या पाठीत कोणतीही समस्या येऊ शकणार नाही." आपल्या वेदनांबद्दल बोलताना शाहरुखनं सांगितलं, "हे वेदनादायक आहे. ॲक्शननंतर मला सेटवर पाहणे ही सर्वात वाईट गोष्ट आहे, कारण मी चित्रपटात खरोखर छान दिसतो." पुरस्कार स्वीकारताना शाहरुखनं आपल्या मजेशीर अंदाजात सर्वांना हसवलं. पुरस्काराचं नाव उच्चारण्यात येणाऱ्या अडचणीचीही' किंग खान'नं खिल्ली उडवली. यानंतर कृतज्ञता व्यक्त करताना त्यानं म्हटलं, "माझे स्वागत करणाऱ्या तुम्हा सर्वांचे आभार." हा पुरस्कार मिळवणार बॉलिवूडमधील शाहरुख हा पहिला सुपरस्टार ठरला आहे.
हेही वाचा :