मुंबई - Mardaani 3 Announcement : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी स्टारर 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. यशराज फिल्म्सनं' मर्दानी' फ्रँचायझीला 10 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा करून राणीच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. राणी मुखर्जी पुन्हा एकदा मुंबई क्राइम ब्रँचच्या सीनियर इन्स्पेक्टर शिवानी शिवाजी रॉयच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा केल्यानंतर यशराज फिल्म्सनं एक व्हिडिओही शेअर केला आहे. 'मर्दानी' आणि 'मर्दानी 2'मध्ये राणीचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. आता 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाची घोषणा झाल्यानंतर अनेकजण राणीला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत.
YASH RAJ ANNOUNCES NEXT CHAPTER IN 'MARDAANI' FRANCHISE... On the 10th anniversary of #Mardaani, #YRF officially announces the third chapter in the franchise.
— taran adarsh (@taran_adarsh) August 22, 2024
🔗: https://t.co/k6QmmnHVqf
The film stars #RaniMukerji as #ShivaniShivajiRoy, a fierce and fearless cop.… pic.twitter.com/CKF6IGX52n
राणी मुखर्जीचा 'मर्दानी'चा तिसरा भाग : 2014 मध्ये यशराज फिल्म्सनं 'मर्दानी' हा चित्रपट निर्मित केला होता. यानंतर पाच वर्षांनी 'मर्दानी 2' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. आता पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर 'मर्दानी' फ्रॅंचायझीचा तिसरा भाग चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यशराज फिल्म्सनं एक व्हिडिओ शेअर केला, यात 'मर्दानी 'आणि 'मर्दानी 2' मधील काही सीन्स दाखविण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये राणी ही तिच्या डॅशिंग कॉप लूकमध्ये ॲक्शन करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी 'मर्दानी' फ्रॅंचायझीच्या तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल यशराज फिल्म्सनं लिहिलं, "मर्दानी'ला 10 वर्षे पूर्ण झाली आणि पुढील चित्रपटाची वाट आहे, डेअरिंग शिवानी शिवाजी रॉय आणि 'मर्दानी'ला 10 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उत्सव साजरा करत आहोत, एक दशक इतके प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. या प्रेमासाठी आम्ही आभारी आहोत, यामुळे आम्हाला एकदा पुन्हा प्रेरणा मिळाली आहे."
वर्कफ्रंट : 'मर्दानी' हा चित्रपट प्रदीप सरकार यांनी दिग्दर्शित केला होता. 'मर्दानी 2'चं दिग्दर्शन गोपी पुथरण यांनी केलं होतं. आता 'मर्दानी'च्या तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन कोण करणार याची घोषणा सध्या करण्यात आलेली नाही. याशिवाय चित्रपटात राणी मुखर्जीबरोबर कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असेल हे देखील उघड झालेले नाही. राणी मुखर्जी आतापर्यंत शेवटची 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' (2023) या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील राणीच्या अभिनयाचं खूप कौतुक करण्यात आलं होतं.
हेही वाचा :
- मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल सुरू होण्यापूर्वी करण जोहर आणि राणी मुखर्जीनं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची घेतली भेट - Karan Johar and Rani Mukerji
- अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी स्टारर 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर ओटीटीवर प्रदर्शित
- Kuch Kuch Hota Hai Special Screening : 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत आयोजित केले स्पेशल स्क्रीनिंग...