हैदराबाद - अल्लू अर्जुनचा बहुप्रतीक्षित 'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबर रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पुष्पा २ च्या प्रीमियर शोदरम्यान हैदराबादमधील थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. यावेळी उसळलेल्या गर्दीत एक महिला ठार झाली आहे तर तिची दोन मुलं गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
बुधवारी रात्री पुष्पा 2 चं प्रीमियर स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. अल्लू अर्जुन रात्री 10.30 वाजता हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पोहोचला. त्याला एक झलक पाहण्यासाठी गर्दी जमली होती. आरटीसी एक्स रोडवर असलेल्या संध्या थिएटरबाहेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यादरम्यान घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत एका महिलेसह २ ते ३ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
#Hyderabad: #Pushpa2 Release at Sandhya Theatre
— Howdy @ Murali Reddy ! ( Jagan కుటుంబం) (@YSJ_21) December 4, 2024
Revati ( 39), a resident of Dilshuknagar came along with her husband Bhaskar and two children Tej (9), Sanvi (7) to Sandhya 70mm theatre at RTC Roads to watch #pusha2 premiere show.
Owing to the chaos, Revathi fell unconscious… pic.twitter.com/JaE5GB0ypP
काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
सोशल मीडिया आणि बातम्यांनुसार, दिलसुखनगरमध्ये राहणारी रेवती (39) पती भास्कर, मुलगा आणि लहान मुलांच्या बरोबर पुष्पा 2 पाहण्यासाठी आली होती. रात्री 10.30 च्या सुमारास रेवती आणि तिचे कुटुंबीय चित्रपटगृहातून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. मिळालेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी थिएटरकडे धाव घेतली आणि बाहेर येणाऱ्या लोकांना या गर्दीनं धक्का दिला.
One woman died & two others including a kid injured after heavy crowd thronged into the Sandhya Theatre in #Hyderabad to have a glance at actor #AlluArjun who arrived there for #PushpaTheRule screening. Police tried to save her but unfortunately declared dead. Kid is safe. pic.twitter.com/BgwpOhxKKm
— Sowmith Yakkati (@YakkatiSowmith) December 4, 2024
या चेंगराचेंगरीमध्ये रेवती आणि तिचे कुटुंबीय जखमी झाले. पोलीस कर्मचारी आणि आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ रेवती आणि तिच्या मुलाला गर्दीपासून दूर केले आणि त्यांना सीपीआर दिला. नंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मुलाला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दुर्दैवानं या घटनेत रेवतीचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात नेण्यात आला आहे.
या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी परिसराला वेढा घातला आणि थिएटरचे दरवाजे बंद केले. दुसरीकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दलांनाही पाचारण करण्यात आलं होतं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करतानाही दिसत आहेत.
#WATCH | Telangana: Actor Allu Arjun arrives at Sandhya theatre in Hyderabad for the premiere show of his film 'Pushpa 2: The Rule'. pic.twitter.com/Pkzra7Y1ja
— ANI (@ANI) December 4, 2024
थिएटरचे मुख्य गेटही कोसळले
आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, थिएटरबाहेर झालेल्या गोंधळादरम्यान थिएटरचे मुख्य गेटही कोसळले. त्यावेळी अल्लू अर्जुन चित्रपटगृहात असल्यानं पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा तैनात करून सुरक्षा वाढवली.
दिग्दर्शक सुकुमार यांचा 'पुष्पा 2: द रुल' गुरुवारी अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि बेंगळुरूमधील निवडक चित्रपटगृहांमध्ये बुधवारी रात्री 9.30 वाजता प्रीमियर शो पार पडले.
हेही वाचा -