ETV Bharat / business

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार गडगडला; मिनिटात कोट्यवधी बुडाले - Stock Market Crash - STOCK MARKET CRASH

Stock Market Crash : इस्रायल आणि इराण यांच्यातील तणावामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही निर्देशांक चांगलेच गडगडले. त्यामुळं गुंतवणूकदारांचे एका मिनिटात कोट्यवधी रुपये बुडाले.

Etv Bharat
शेयर बाजार फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 5, 2024, 10:43 AM IST

Updated : Aug 5, 2024, 11:54 AM IST

मुंबई Stock Market Crash : जागतिक स्तरावरील घडामोडींचा फटका हा भारतीय शेयर बाजाराला बसत आहे. 'बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'चा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1500 अंकांच्या घसरणीसह 80,000 च्या खाली गेला, तर निफ्टी-50 देखील जवळपास 500 अंकांनी घसरली. या मोठ्या घसरणीत काही मिनिटांतच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे जवळपास १० लाख कोटी रुपये बुडाले.

शेयर बाजारात 'ब्लॅक मंडे' : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी (5 ऑगस्ट) शेअर बाजार घसरणीनंच उघडला. BSE सेन्सेक्स 1,310.47 अंक किंवा 1.62 टक्क्यांच्या घसरणीसह 79,671.48 वर उघडला, तर निफ्टी 404.40 अंक किंवा 1.64 टक्क्यांच्या घसरणीसह 24,313.30 वर उघडली. बाजार उघडल्यानंतर 2368 शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली, तर सुमारे 442 शेअर्समध्ये वाढ दिसून आली. दोन्ही बाजार निर्देशांकातील ही सुरुवातीची घसरण काही मिनिटांत आणखी वाढली. सकाळी 9.20 वाजता सेन्सेक्स 1,585.81 अंकांनी किंवा 1.96% ने घसरून 79,396.14 च्या पातळीवर आला, तर निफ्टी 499.40 अंकांनी किंवा 2.02% ने घसरून 24,218.30 च्या पातळीवर आला.

10 लाख कोटी रुपयांचं नुकसान : शेअर बाजारातील या घसरणीमुळं शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. एकीकडं गेल्या शुक्रवारी बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांना सुमारे 4 लाख कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं होतं, तर दुसरीकडं सोमवारी अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे सुमारे 10 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं.

अनेक क्षेत्रांना फटका बसण्याची शक्यता : मुंबई शेअर मार्केटमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थिती जबाबदार ठरल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे रिअॅलिटी क्षेत्र, आयटी, बँकिंग व आर्थिक सेवा क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे.

Last Updated : Aug 5, 2024, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.