मुंबई- मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात ८०,०३९ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक २४,२९२ वर पोहोचला.
मुंबई शेअर बाजार खुला होताच निर्देशांक ४८१ अंकांनी वाढून ७९,९२३ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक १३३ अंकांनी वाढून २४,२५७ वर पोहोचला.
या कंपन्यांचे शेअर वधारले-घसरले-एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्स या कंपन्यांचे शेअर सर्वाधिक वाढले आहेत. तर टेक महिंद्रा, टीसीएस, सन फार्मा, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. केवळ आयटी कंपन्यांचे शेअर घसरले आहेत.
मंगळवारी शेअर बाजारात काय स्थिती होती?- आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराचा निर्देशांक ३४ अंकांच्या घसरणीसह ७९,४४१.४५ वर बंद झाला. तर निफ्टीचा निर्देशांक ०.०७ टक्क्यांच्या घसरणीसह २४,१२३.८५ वर बंद झाला. निफ्टीमध्ये विप्रो, इन्फोसिस, एल अँड टी, एचडीएफसी बँक आणि एचसीएल टेक्नॉलॉजीस या कंपन्यांचे शेअर वधारले. तर श्रीराम फायनान्स, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक या कंपन्यांचे शेअर घसरले.
- यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्यानंतर बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. मंगळवारी मुंबईतील स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति तोळा ७१,९९२ रुपये आहे. तर चांदीचा दर ८८,०१५ रुपये प्रति किलो राहिला. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ७४,२५० रुपये तर चांदीचा दर प्रति किलो ९०,००० रुपये होता.
जोखीम क्षमता ओळखून गुंतवणूक करा-भारतीय शेअर बाजार हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी एक आवडते ठिकाण असल्याचे सिद्ध झाले आहे. अनुकूल सरकारी धोरणे आणि लवचिक आर्थिक दृष्टीकोन यासारख्या घटकांमुळे शेअर बाजाराचा निर्देशांक उंचावला आहे. असे असले तरी गुंतवणुकदारांनी नेहमीच सावध राहिले पाहिजे, असे कोटक म्युच्युअल फंडाचे एमडी नीलेश शाह सांगितलं. शाह म्हणाले, "तुम्ही किती जोखीम घेऊ शकता हे ओळखून बाजारात गुंतवणूक करा. दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवा. शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे एक टप्पा आहे. मात्र, ते उद्दिष्ट नाही. "
हेही वाचा-