नवी दिल्ली LPG Price rise - ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 39 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ आजपासून लागू होणार आहे. त्यामुळे दिल्लीत 19 किलोचे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर हा 1,691.50 रुपयांना मिळणार आहे.
- ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायांना चालना देण्याकरिता 1 जुलैला गॅस सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी कमी केली होती. तेव्हा व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा दर हा 1646 रुपये होता.
- 1 जूनला ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी आणखी दर कमी केले होते. त्यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरचा दर 69.50 रुपयांनी कमी होऊन 1676 रुपये होते. यापूर्वी 1 मे 2024 रोजी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात 19 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
- प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला एलपीजी सिलिंडरच्या किमतीचे दर तेल ऑईल मार्केटिंग कंपन्यांकडून निश्चित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, कर धोरण आणि बाजारातील पुरवठा-मागणी यासारखे विविध घटक लक्षात घेऊन सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून गॅस सिलिंडरचे दर बदलतात.
इतर देशांच्या तुलनेत भारतात एलपीजीचे दर कमी
- दिल्लीत 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत सुमारे 803 रुपये आहे. तर पाकिस्तानमध्ये या वर्षी 1 मे रोजी त्याची किंमत 1,017.25 रुपये आहे. श्रीलंकेत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत 1,320.94 रुपये आणि नेपाळमध्ये 1,207.84 रुपये आहे, अशी केंद्र सरकारच्या वतीनं लोकसभेत माहिती देण्यात आले.
- देशांतर्गत वापरल्या जाणाऱ्या 60 टक्क्यांहून अधिक एलपीजीची आयात करण्यात येते. त्यामुळे देशातील एलपीजीच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीप्रमाणे बदलण्यात येतात.
सरकारकडून तेल कंपन्यांना दिली जाते नुकसान भरपाई- पहल (PAHAL) योजनेअंतर्गत, घरगुती एलपीजी सिलिंडर विनाअनुदानित किमतीत विकले जातात. ग्राहकांना सबसिडी थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. ग्राहकांना बँक खात्यांमध्ये थेट अनुदान देण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारकडून सरकारी तेल कंपन्यांना नुकसान भरपाई दिली जाते. केंद्र सरकारनं आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 22,000 कोटी रुपयांची भरपाई सरकारी तेल कंपन्यांना दिली होती.
हेही वाचा-