मुंबई: JSW MG Motor first car जेएसडब्ल्यू कंपनीनं एमजी मोटर इंडियात ३८ टक्के हिस्सा घेतल्यानंतर आता नवीन कारचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार कशी असणार आहे, याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे. या कारचं कंपनीकडून आज शोकेस करण्यात आलं आहे. जेएसडब्ल्यू कंपनीचे मालक सज्जन जिंदाल आणि त्यांचे पुत्र पार्थ जिंदाल यावेळी उपस्थित होते.
स्टील उद्योगातील अग्रेसर कंपनी असलेल्या जिंदाल ग्रुपनं आता मॉरिस गॅरेज या गाड्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. जेएसडब्ल्यू एमजी इंडिया मोटर्स लिमिटेड या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या माध्यमातून आता इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात नवीन गाड्या उत्पादित करणार असल्याचे जेएस डब्ल्यूचे चेअरमन सज्जन जिंदाल यांनी सांगितले. इलेक्ट्रिक गाड्यांच्या क्षेत्रामध्ये आता नवीन क्रांती होण्याची शक्यता आहे. जे एस डब्ल्यू एमजी इंडिया मोटर्स ही नवीन कंपनी आज सुरू करण्याची घोषणा मुंबईतील एका कार्यक्रमात केली. गाड्यांच्या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एमजी या कंपनीसोबत जेएसडब्ल्यू या कंपनीने भागीदारीत प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
जेएसडब्ल्यूच्या रूपानं चांगला भागीदार- गाड्यांच्या क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या मॉरिस गॅरेज या कंपनीने दोन लाखांपेक्षा अधिक ग्राहकांपर्यंत आपले उत्पादन पोहोचवले आहे. मॉरिस गॅरेज या कंपनीच्या गाड्यांना बाजारात वाढती मागणी आहे. सध्या पहिल्या क्रमांकावर या गाड्यांची विक्री होत असल्याचा दावा कंपनीचे सीईओ राजीव छाबा यांनी केला आहे. यावेळी बोलताना राजीव छाबरा म्हणाले की, "जेएस डब्ल्यूच्या रूपानं आम्हाला भारतात खूप चांगला भागीदार मिळाला आहे. या माध्यमातून आम्ही आता भारतात न्यू एनर्जी व्हेकल्स खूप चांगल्या पद्धतीने आणू शकणार आहोत. जे एसडब्ल्यूग्रुपकडे असलेले तंत्रज्ञान त्यांचा अनुभव आणि त्यांची उत्पादनाची क्षमता ही आम्हाला खूपच फायदेशीर ठरणार आहे.कंपनी आपली उत्पादन क्षमता वाढवणार आहे. गुजरात येथील हलोल येथे एक लाखांपासून ते सुमारे तीन लाखांपर्यंतच्या गाड्या वार्षिक उत्पादित केल्या जातील, असा दावा छाबा यांनी केला आहे.
2030 पर्यंत न्यू एनर्जी व्हेकल्सचे अधिकाधिक उत्पादित करण्यात येणार-जेएसडब्ल्यू कंपनीचे पार्थ जिंदाल म्हणाले की, आम्ही आमच्या कंपनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्याचा निर्णय घेतला असून आता न्यू एनर्जी वेहिकल 2030 पर्यंत बाजारामध्ये सुमारे 60 टक्क्यांपेक्षा अधिक दिसाव्यात यासाठी प्रयत्न करणार आहोत. जर आपल्याला भारताची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर अशा पद्धतीचा गाड्या बाजारात आणल्या पाहिजे, हे स्पष्ट झाले आहे. चीनने इलेक्ट्रिक व्हेईकल बाजारात आणल्यानंतर त्यांची अर्थव्यवस्था बूस्ट झाली होती. भारतालाही याबाबत संधी असून आपण अधिकाधिक उत्पादन करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
प्लग इन हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेईकल- यावेळी बोलताना जेएसडब्ल्यू कंपनीचे चेअरमन सज्जन जिंदाल म्हणाले, आमची कंपनी जगभरातील सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी असून 23 बिलियन डॉलर्स एवढा आमचा मार्केट शेअर आहे. आमच्या कंपनी चाळीस हजार कामगार काम करीत आहेत. लहानपणापासून माझे कार बनवण्याचे स्वप्न होते. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत होतो. मात्र कोरोना काळात काही अडचणी आल्या. आता देशातील एमजी या सर्वात प्रतिष्ठित ब्रँड सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळते आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आम्ही आता प्लग इन हायब्रीड वाहन तयार करीत आहोत. तुम्ही शहरात 100 ते 150 किलोमीटर बॅटरीवर गाडी चालवू शकता. मात्र शहराबाहेर गेल्यानंतर आजही आपल्याकडे चार्जिंग पॉइंटची कमतरता आहे. भविष्यात चार्जिंग पॉइंट उभारले जातील, यात शंका नाही. मात्र तोपर्यंत ग्राहकांना अडचण येऊ नये म्हणून ही नवीन तंत्रज्ञान आम्ही आणत आहोत. बॅटरी संपल्यानंतर तुम्ही गाडी इंजिनवर स्विच करू शकता, नवीन चार्जिंग पॉइंट मिळेपर्यंत तुम्ही चालवू शकता. त्यामुळे ग्राहकांना कुठेही अडचण येणार नाही. अशा पद्धतीच्या नव्या गाड्या आम्ही सप्टेंबरपासून बाजारात आणणार आहोत. त्याची जोरदार तयारी सुरू आहे असे सज्जन जिंदाल यांनी सांगितले. या गाड्यांमुळे बाजारात निश्चितच क्रांती होईल असा विश्वास जिंदाल यांनी व्यक्त केला.
मारुतीप्रमाणं मोमेंट येईल-दर तीन ते चार महिन्यातं नवीन कार सप्टेंबरपासून लाँच करण्यात येणार आहे. या कारची निर्यातदेखील करण्यात येणार आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर उत्पादन आणि विकास करण्यात येणार आहे. हे माझं स्वप्न आहे. चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी काम करत आहोत. त्यासाठी स्टार्टअपबरोबर काम करत आहोत. १९८४ मध्ये मारुतीनं वाहन उद्योगाचे चित्र बदलले. त्यामध्ये फियाट आणि अॅम्बिसिडरचा समावेश आहे. सध्या मारुती कंपनीचा ५० टक्के वाहन उद्योगावर ताबा आहे. त्याप्रमाणं इलेक्ट्रिक कारची निर्मिती करताना मारुतीप्रमाणं मोमेंट येईल अशी कल्पना आहे.
- सायबरस्टर गाडी लॉन्च करणार-जेएसडब्ल्यू एमजी मोटर्स इंडिया या कंपनीची पहिली कार लवकरच लाँच करण्यात येणार आहे. या कारमध्ये नवीन तंत्रज्ञान असणार आहे. ही कार ग्राहकांना निश्चितच आवडेल, असा विश्वास राजीव छाबरा आणि सज्जन जिंदाल यांनी व्यक्त केला. ही गाडी यावेळी दाखवण्यात आली.
देशातच वाहनांचे उत्पादन- यावेळी बोलताना राजीव छाबरा यांनी सांगितले की, या गाड्यांची निर्मिती भारतात करणार असल्यामुळे भारतातील विविध लघूउद्योग समूहांना याचा फायदा होणार आहेत. गाड्यांचे अन्य सुटे भाग तयार करण्याचे काम भारतातच होणार आहे. ही गाडी भारतातच तयार करण्यात येत असल्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय ग्राहकांचा विचार करून येत्या दीड वर्षात या गाड्यांची किंमत पेट्रोल गाड्यांची करण्याचा आमचा मानस राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एमजी मोटर्समध्ये जेडब्ल्यूचा ३८ टक्के हिस्सा- भारतीय स्पर्धात्मक आयोगानं नुकतेच जेएसडब्ल्यू ग्रुपनं एमजी मोटर इंडियामधील ३८ टक्के हिस्सा घेण्याकरिता मंजुरी दिली आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडिया हे कंपनीचं नवं नाव असणार आहे. या कंपनीनं आता वाहन उत्पादनात वेगानं विस्तार करण्याचं धोरण आखलं आहे. त्याचाच भाग म्हणून कंपनीकडून स्पोर्ट्स श्रेणीत इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येणार आहे.सीसीआयच्या माहितीनुसार जेएसडब्ल्यू व्हेंचर्स सिंगापूर कंपनीला एमजी मोटर इंडियामध्ये सुमारे ३८ टक्के हिस्सा घेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
- कोणाकडं आहे कंपनीची मालकी-एमजी मोटर इंडिया कंपनीची मालकी ही शांघाय येथील एसएआयसी कंपनीकडं आहे. जेएसडब्ल्यू व्हेंचर्स सिंगापूर ही जेएसडब्ल्यू इंटरनॅशनल ट्रेडकॉर्पची कंपनी आहे. ही कंपनी जेएसडब्ल्यूचे मालक सज्जन जिंदाल यांच्याशी संबंधित आहे.
२००९ पासून एमजी मोटरची देशात ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक- एमजी मोटर ही कंपनी इलेक्ट्रिक चारचाकींसह पॅसेंजर कारची एमजी या ब्रँडनं विक्री करते. आगामी काळात अधिक वेगानं प्रगती आणि विस्तार होईल, असा विश्वास यापूर्वीच एमजी मोटर इंडियाचे सीईओ एमिरट्स राजीव छाबा यांनी व्यक्त केला होता. एमजी मोटर इंडियानं नवीन कारखान्यांकरिता ४ हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. त्यासाठी कंपनीनं विविध राज्यांशी चर्चा केली. कंपनीकडून गुजरातमधील हल्लोल कारखान्यांतून वाहनांचे उत्पादन होते. हे उत्पादन वाढविण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. २००९ पासून एमजी मोटर इंडियानं देशात सुमारे ७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा-