ETV Bharat / business

कोहलीनं निवृत्तीबाबत एकदाचं सांगून टाकलं, क्रिक्रेटप्रेमी पडले चिंतेत! - IPL 2024

आरसीबीकडून सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीनं प्रथमच निवृत्तीबाबत मत व्यक्त केलं. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमी विराट कोहलीच्या निवृत्तीबाबतच्या कल्पनेबाबत सोशल मीडियात प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

Virat Kohli on retirement plan
Virat Kohli on retirement plan (Source- IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 1:10 PM IST

Updated : May 16, 2024, 2:39 PM IST

नवी दिल्ली: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं आयपीएलमध्ये आरसीबीसाठी दमदार कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये विराट कोहलीनं क्रिकेटमधील निवृत्तीबाबत आपली भावना व्यक्त केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी शेअर करत आहेत. तसेच भावूक होत प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

व्हिडिओमध्ये विराट कोहलीनं म्हटले, "एकदा माझं क्रिकेट संपलं की तुम्ही मला पुन्हा कधीही क्रिकेटमध्ये पाहू शकणार नाही. माझे करिअर काही अपूर्ण राहिलेल्या व्यवसायानं संपवायचे नाही. एकदा माझे क्रिकेट संपले की मी सोडणार आहे. तुम्ही मला थोडा वेळ द्याल. जोपर्यंत मी खेळत आहे, तोपर्यंत मला माझे पूर्ण सर्वस्व द्यायचे आहे. विराट कोहलीच्या व्हिडिओवर क्रिकेटप्रेमींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरनं लिहिले की," मी असत्य बोलणार नाही. पण विराटनं शेवटचं वाक्य म्हणताच माझ्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आले."

क्रिकेटप्रेमी नाराज- दुसऱ्या युजरनं लिहिले, "या माणसाचा आमच्या आयुष्यावर एवढा प्रभाव का आहे, त्याला कळतही नाही. एका खेळाडूशी आपण इतके भावनिक कसे होऊ शकतो? विराटनं खेळणं कधीच थांबवू नये. एका युजरनं आरसीबीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानं पोस्टमध्ये म्हटले, " अशा पोस्ट करून आरसीबी अॅडमिननं मूड खराब करू नये. अशा पोस्ट रात्री पोस्ट करू नये. विराटनं अशी गोष्ट कधीही बोलू नये." आयपीएल २०२४ च्या हंगामात विराटनं सर्वाधिक धावा केल्या आहेत.

बाबर आझमनं विराटचा मोडला विक्रम- पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमनं भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात खेळली गेलेली 3 सामन्यांची T20 मालिका पाकिस्ताननं पहिला सामना गमावल्यानंतर 1-2 ने जिंकली आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बाबर आझमनं तडाखेबंद फलंदाजी करत अर्धशतकी खेळी केली. त्यानं 42 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. या खेळीसह बाबरनं आपल्या T20 कारकिर्दीत 39व्यांदा 50 हून धावा केल्या आहेत. यासह त्यानं विराट कोहलीला मागे टाकत नवा विक्रम केला आहे.

हेही वाचा-

  1. पंजाबच 'किंग'; सॅम करनच्या फटकेबाजीनं राजस्थान संघाला चारली धूळ, पराभवानंतरही राजस्थाननं साकारलं प्लेऑफचं स्वप्न - RR vs PBKS
  2. मुलांच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल अनुष्का-विराटनं गिफ्ट पाठवून मानले पापाराझीचे आभार - anushka sharma
  3. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा फोटो व्हायरल, चाहत्यांनी केलं कौतुक - anushka sharm

Last Updated : May 16, 2024, 2:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.