ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक वक्तव्याबाबत मोदी-शाहांवर कारवाई होणार? 'सेबी'ला काय आहेत अधिकार? - INDIA Alliance Complaint to SEBI - INDIA ALLIANCE COMPLAINT TO SEBI

INDIA Alliance Complaint to SEBI : लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी तेजी निर्माण होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी निवडणूक निकालापूर्वी केला होता. त्यामुळं 'इंडिया' आघाडीच्या (India Alliance) खासदारांनी मंगळवारी (18 जून) सकाळी 'सेबी'कडं (SEBI) तक्रार दाखल केली. परंतु मोदी-शाहांवर कारवाई होणार का? वाचा सविस्तर बातमी...

PM Modi Amit Shah
पीएम नरेंद्र मोदी आणि अमित शाह (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 18, 2024, 6:32 PM IST

मुंबई INDIA Alliance Complaint to SEBI : लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी काही दिवस शेअर बाजार निर्देशांकात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं शेअर बाजारातील हे चित्र कायम राहील असं अनेकांना वाटत होतं. गुंतवणूकदारांनी देखील मोठी गुंतवणूक केली होती. तर लोकसभा निवडणूक निकालादिवशी शेअर बाजार निर्देशांक वधारणार असल्याचं वक्तव्य अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक निकालाआधी केलं होतं. या वक्तव्याविरोधात आज (मंगळवारी) इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सेबीकडं तक्रार दाखल केली. यावेळी शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत, तृणमूल काँग्रेसचे साकेत गोखले, सागरिका घोष, कल्याण बॅनर्जी, विद्या चव्हाण असे नेते उपस्थित होते. मात्र यावर 'सेबी'ला काय अधिकार आहेत? कायदा काय सांगतो? त्यावर कारवाई होऊ शकते का? गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी? याबाबत बँकिंग तज्ञ आणि शेअर बाजार अभ्यासक विश्वास उटगी यांनी काय म्हटलंय पाहूया.

प्रतिक्रिया देताना बँकिंग तज्ञ विश्वास उटगी (ETV BHARAT Reporter)

कारवाईचे अधिकार 'सेबी'ला आहेत : नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी लोकसभा निकालाआधी शेअर बाजार वधारेल असं वक्तव्य केलं होतं. याविरोधात इंडिया आघाडीतील नेत्यांनी सेबीकडं तक्रार दाखल केलीय. पण सर्वसामान्यांना प्रश्न पडलाय की, मोदी-शाहांच्या वक्तव्याविरोधात सेबी तक्रार दाखल करु शकते का? तर होय हे 'सेबी'ला अधिकार आहेत. कारण शेअर ट्रेडिंग असो, गुंतवणुकीबाबत अफवा पसरवणं असो किंवा शेअर बाजाराबाबत कोणी चुकीची माहिती पसरवत असेल तर त्याविरोधात कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे 'सेबी'ला असतात. पण मला वाटत नाही की, मोदी-शाहांवर कारवाई होईल. तसंच गोपनीय माहिती बाहरे पसरवणं या कायद्याअंतर्गत सेबी कारवाई देखील करु शकते, असं कायदा सांगतो. पण मोदी-शाहांवर 'सेबी' कोणती कारवाई करते हे पाहावं लागेल, असं शेअर बाजार अभ्यासक विश्वास उटगी यांनी म्हटलंय.

विरोधकांनी जेपीसीची मागणी केली पाहिजे : पुढे बोलताना विश्वास उटगी म्हणाले की, सेबी ही स्वायत्त संस्था आहे. परंतु ती पार्लमेंटशी बांधील आहे. पण सरकारमधील कुठल्याही संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने शेअर बाजाराविषयी वक्तव्यं करणं हे चुकीचं आहे. कारण सेबीतील अधिकारी आणि सरकारमधील लोक ही गोपनीय माहिती बाहेर सांगू शकत नाहीत. मोदी-शाहांचे वक्तव्य हे चुकीचं आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याचे नक्कीच सेबीला अधिकार आहेत. पण सेबी ही तक्रार गांभीर्याने घेईल का? हा प्रश्नच आहे आणि त्यांच्यावर कारवाई करेल का? हा पण प्रश्नच आहे. तसंच संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी जेपीसीची मागणी केली पाहिजे. तसंच हा मुद्दा सभागृहात लावून धरला पाहिजे. तरच इथून पुढे असं कुणीही उघडपणे वक्तव्य करणार नाही. त्याला चाप बसेल असंही उटगी म्हणाले.

गुंतवणूकदारांनी खबरदारी घेतली पाहिजे : लोकसभा निवडणुकीच्या आधी अमित शाह वारंवार विशिष्ट 5 शेअर विकत घ्या असं सांगत होते. परंतु असं सांगणं अत्यंत चुकीचं आणि नियमबाह्य आहे. निकालाच्या आधी एक्झिट पोलनंतर शेअर बाजार कमालीचा वधारला. दोन आणि तीन तारखेला सार्वजनिक सुट्टी होती. चार जून सोमवारी निकालादिवशी शेअर बाजार पडल्याचं चित्र सर्वांनी पाहिलं. पण निकालाच्या आधी अमित शाह विशिष्ट पाच प्रकारचे शेअर विकत घ्या असं सांगत होते आणि काही गुंतवणूकदारांनी त्याला बळी पडून 31 लाख कोटीचे शेअर्स विकत घेतले. त्यामुळं गुंतवणूकदारांचं 31 लाख कोटीचं नुकसान झालं आहे. पण असं कोणीही या कंपनीचे शेअर्स विकत घ्या असं म्हटलं तर त्याला गुंतवणूकदारांनी बळी न पडता, अभ्यास करून आणि बाजारातील परिस्थितीचं भान राखून शेअर विकत घेतले पाहिजेत, असंही बँकिंग तज्ञ आणि शेअर बाजार अभ्यास विश्वास उटगी यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा; विधानसभेतील जागावाटपाची यादी तयार? - Maharashtra Politics

राजकीय पक्ष लागले कामाला; विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान, पाहा वेळापत्रक - Vidhan Parishad Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.