ETV Bharat / business

महागाईपासून बचाव करायचा असेल तर गोल्ड ईटीएफसह गोल्ड बॉन्ड्सचा आहे चांगला पर्याय - Gold investment

सोन्याच्या किमती यंदा अक्षय तृतीयेला गतवर्षीच्या तुलनेत  २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. सोन्याच्या किमती वाढत असताना भौतिक सोने खरेदीपेक्षा गोल्ड ईटीएफ किंवा सार्वभौम सोने रोख्यांचा पर्याय निवडला तर सोने जवळ बाळगण्याचा अतिरिक्त ताण राहणार नाही.

प्रतिकात्मक
Gold ETFs And Sovereign Gold Bonds (Source- ETV Bharat)
author img

By Sutanuka Ghoshal

Published : May 13, 2024, 7:54 PM IST

कोलकाता: सोन्यानं गेल्या तीन वर्षांत 13 टक्क्यांचा सीएजीआर (CAGR) दिला आहे. सीएजीआर म्हणजे कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट हा एखाद्या कालावधीत गुंतवणुकीची झालेली वाढ निश्चित करण्यासाठी मोजला जातो. भारतीयांना इतिहासकाळापासून सोन्याच्या दागिन्यांबद्दल प्रेम आहे, ETFs आणि SGBs असल्यानं एखाद्याला लॉकर ठेवण्याचा अतिरिक्त खर्च न करता आणि सोन्याच्या दागिन्यांच्या सुरक्षेबद्दल तणाव न होता सोने ठेवण्यास मदत होते.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एएमसीच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजीचे प्रमुख चिंतन हरिया म्हणाले, "अक्षय तृतीयेसारख्या शुभ मुहर्तावर सोने खरेदी करणं ही भारताच्या अत्यंत जुन्या परंपरापैकी एक परंपरा आहे. गेल्या तीन वर्षांपासून सोन्यातून १३ टक्के एवढा चांगल्या पद्धतीचा सीएजीआर मिळत आहे. भविष्यातही अशीच सकारात्मक स्थिती राहणार आहे. सोन्याचे दर वाढण्याची विविध आहेत. यामध्ये अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून व्याजदर कपातीपाबाबत निर्णय घेण्यास उशीर होण्याची शक्यता, भू-राजकीय वाढणारे तणाव, देशांतर्गत शेअरचे होणारे महागडे मूल्यांकन आणि लोकसभा निवडणू अशी कारणे आहेत. प्रचंड वाढणारी महागाई आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात असलेली आर्थिक अनिश्चितता, अशी स्थिती असताना सोने हे भांडवल गुंतवणुकीकरिता चांगला पर्याय ठरू शकते. सोन्यातील गुंतवणुकीकरिता प्रत्येकापुढे विविध पर्याय आहेत. त्यापैकी सुवर्ण ईटीएफ ( Gold ETF) हा सोपा पर्याय आहे. भौतिक सोने ताब्यात न घेता किंवा जवळ न बाळगता सुवर्ण ईटीएफ हा सोपा आणि कमी खर्चातील गुंतवणुकीचा पर्याय आहे." गोल्ड ईटीएफची तरलक्षमता ( Liquidity) हा चिंतेचा विषय नाही. कारण, गोल्ड ईटीएफची शेअर बाजाराच्या ट्रेडिंगप्रमाणं विक्री करता येत असल्याचं हरिया यांनी सांगितलं.

काय आहे गोल्ड ईटीएफ? गोल्ड ईटीएफ म्हणजे गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) हे गुंतवणुकीचं साधे उत्पादन आहे. त्यामध्ये शेअरमधील लवचिक गुंतवणूक आणि सोन्यातील गुंतवणुकीचा साधेपणा असतो. बाजारातील किमतीप्रमाणं कंपनीच्या शेअरची खरेदी करण्याप्रमाणं ईडीएफची खरेदी आणि विक्री ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज करता येते. गोल्ड ईटीएफची गुंतवणूक ही सोन्याच्या किमतीवर आधारित असते. तर गुंतवणूक ही सोन्याच्या दरवाढीवर निश्चित होते. थेट सोन्याच्या किमतीवर गोल्ड ईटीएफ असल्यानं त्यात संपूर्णपणं पादर्शकता असते. आणखी सांगायचं झाले तर गोल्ड ईटीएफच्या अद्वितीय रचना आणि संरचनेमुळे ईटीएफ ही भौतिक सोन्यातील गुंतवणुकीच्या तुलनेत कमी खर्चातील गुंतवणूक असते. गोल्ड ईटीएफची असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) ही तीन वर्षांमध्ये दुप्पट होऊन 33 हजार कोटी झाली आहे.

काय आहे सार्वभौम सोने रोखे ( Sovereign Gold Bond)- सार्वभौम सोने रोख्यांमध्ये सोन्याचे आणि रोख्यांचे फायदे मिळतात. प्रत्येकाला सोन्याची मालकी नसतानाही गुंतवणूक करण्याची संधी मिळावी म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सार्वभौम सोने रोखे जारी केले जातात. भौतिक सोन्यात अशुद्धपणा असण्याची शक्यता असते. मात्र, सार्वभौम सोने रोख्यांना आरबीआय आणि भारत सरकारकडून हमी असते. गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड फंडमधून भौतिक सोन्याप्रमाणं परतावा देण्याचा प्रयत्न असतो. मात्र, त्यामधून मिळणाऱ्या परताव्याचे प्रमाण अनिश्चित असते. दुसरीकडं सुर्वण रोख्यांमधील परतावा निश्चित असतो.

काय आहे तज्ज्ञांचं मत?- टाटा असेट मॅनेजमेंटचे फंड मॅनजेर (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले, "मार्च 2024 पासून सोन्याच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. सोन्याच्या किमतीनं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उच्चांक गाठला आहे. देशात सोन्याचा दर प्रति तोळा 73 हजारांहून अधिक आहे. तर कोमेक्स किंमतीत सोन्याचा दर प्रति औंस हा 2400 डॉलर आहे. गुंतवणूकदार हे सुवर्ण रोखे आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करत आहेत. भू-राजकीय स्थिती, केंद्र सरकारकडून होणारी सोने खरेदी आणि जागतिक पातळीवर स्थिती पाहता सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने बदलेले व्याजदर हे सोन्याच्या किमती वाढविण्यासाठी आणखी प्रोत्साहनपर ठरू शकतात. सोन्याच्या खरेदीचा वाढता पाहता सोन्याच्या किमती आणखी वाढतील, असं आम्हाला वाटतं." पुढे पटेल म्हणाले, " भौतिक सोन्यापेक्षा सोन्यातील इतर गुंतवणुकीकडं गुंतवणूकदार वळू शकतात. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सुवर्ण रोख्यांमध्ये तर कमी कालावधीत गुंतवणूक करू पाहणारे ईटीएफमध्ये गुंतवणूक करू शकतात," असे पटेल यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर सोने महाग की स्वस्त? वाचा, प्रमुख महानगरांमधील मौल्यवान धातुंचे दर - Gold price today
  2. 'अक्षय्य तृतीया'च्या मुहूर्तावर का खरेदी करतात सोनं? वाचा सविस्तर इतिहास - Akshaya Tritiya 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.