ETV Bharat / bharat

पूर्व नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये २० आमदारांसह एकानंही केलं नाही मतदान, शून्य टक्के मतदानाचं कारण तरी काय? - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : लोकसभा 2024 निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व नागालँडच्या सहा जिल्ह्यांमध्ये एकानंही मतदान केलं नाही अर्थात शून्य मतदान झालं. त्यानंतर ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन (ENPO)नं शनिवारी या जिल्ह्यांमध्ये लागू केलेला अनिश्चित काळासाठीचा संपूर्ण बंद मागं घेतलाय.

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 7:16 PM IST

कोहिमा Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी १९ एप्रिल रोजी मतदान झालं. या कालावधीत विविध राज्यातील 102 जागांवर मतदान झालं. दरम्यान, नागालँडच्या पूर्वेकडील सहा जिल्ह्यांमध्ये एकही मतदान झालं नाही. येथील मतदान कर्मचारी नऊ तास मतदान बूथवर मतदारांची वाट पाहात होते. परंतु एकही मतदार मतदान करण्यासाठी बुथवर फिरकला नाही. फ्रंटियर नागालँड टेरिटरी (एफएनटी) च्या मागणीसाठी ईस्टर्न नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशन संघटनेनं पुकारलेल्या संपानंतर या भागातील चार लाख मतदारांपैकी एकानंही मतदान केलं नाही.

सहा जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान : नागालँडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी आवा लोरिंग यांनी सांगितलं की, 20 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या प्रदेशातील 738 मतदान केंद्रांवर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी नऊ तासांत कोणीही मतदानासाठी आलं नाही. एवढंच नाही, तर 20 आमदारांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही. नागालँडमधील 13.25 लाख मतदारांपैकी पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये 4 लाख 632 मतदार आहेत.

20 आमदारांनी केलं नाही मतदान : राज्याच्या राजधानीपासून सुमारे 41 किमी अंतरावर असलेल्या तौफेमा येथील त्यांच्या गावात मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना नागालॅंडचे मुख्यमंत्री नेफिउ रिओ म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत एफएनटीच्या कामकाजाचा मसुदा स्वीकारला आहे. प्रदेशातील निवडून आलेले आमदार, प्रस्तावित FNT च्या सदस्यांमध्ये सत्तेतील वाटा वगळता सर्व काही ठीक आहे, असं दिसतं. ENPO सहा जिल्ह्यांचा समावेश असलेल्या वेगळ्या राज्याची मागणी करत आहे. कोणत्याच सरकारांनी या प्रदेशात सामाजिक-आर्थिक विकास केला नाही, असा त्यांचा आरोप आहे. तथापि, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्य सरकारनं आधीच स्वायत्त संस्थेची शिफारस केली आहे. जेणेकरून या प्रदेशाला उर्वरित राज्याच्या बरोबरीनं पुरेसं आर्थिक पॅकेज मिळू शकेल. मतदान न केल्याबद्दल पूर्व नागालँडमधील 20 आमदारांवर कारवाई केली जाईल का, असं विचारलं असता ते म्हणाले, “आम्हाला संघर्ष नको आहे. बघूया काय होईल ते."

ईएनपीओला कारणं दाखवा नोटीस : नागालँडमध्ये लोकसभा निवडणुका सुरू होण्याच्या काही तास आधी, ENPO नं गुरुवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून राज्याच्या पूर्व भागात अनिश्चित काळासाठी पूर्ण बंद पुकारला होता. एखादी व्यक्ती मतदानासाठी गेल्यास कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित मतदारावर राहील, असंही संस्थेनं कळवलं होतं. नागालँडचे सीईओ वायसन आर यांनी गुरुवारी रात्री ईएनपीओला यासंदर्भात कारणं दाखवा नोटीस बजावली आहे.

हे वाचलंत का :

  1. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं आश्वासन; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ - Thackeray On Devendra
  2. 'राहुल गांधींना वायनाडमध्ये संकट वाटतंय, निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेसनं मानली हार'; नांदेडमधून मोदींची टीका - PM Narendra Modi Rally
  3. "पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सहमतीनं...", अजित पवार गटाचा मोठा खुलासा - NCP Press Conference

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.