ETV Bharat / bharat

क्रिकेट खेळताना हार्ट अटॅक आला, तरुणाचा जागीच मृत्यू! - heart attack

Heart Attack Playing Cricket : एका 28 वर्षीय तरुणाला क्रिकेट खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. सहकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात नेलं, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Heart Attack
Heart Attack
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 7:41 PM IST

शामली (उत्तर प्रदेश) Heart Attack Playing Cricket : देशात गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या झटक्यानं आकस्मिक मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. याच क्रमात, उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात अशीच एक घटना घडली.

गोलंदाजी करताना हृदयविकाराचा झटका : येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान गोलंदाजी करणाऱ्या तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. झटक्यानंतर तो तेथेच कोसळला. सहकारी खेळाडूंनी त्याचं हार्ट पंप करत त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

रुग्णालयात पोहचण्याआधीच मृत्यू : 28 वर्षीय कुलदीप वर्मा असं या तरुणाचं नाव आहे. तो ठाकूरद्वार मार्केटमध्ये दागिन्यांचा कारागीर होता. कुलदीप शनिवारी सकाळी व्हीव्ही पीजी कॉलेजमध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळत होता. या सामन्यात सहभागी असलेला सहकारी खेळाडू अक्षय वर्मानं सांगितलं की, कुलदीप गोलंदाजी करत होता. दरम्यान, अचानक तो जमिनीवर पडला. त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. हार्ट पंप केल्यानंतर मित्रांनी त्याला खासगी रुग्णालयात नेलं. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सामन्यात सहभागी असलेल्या सहकाऱ्यांच्या मते, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यानं कुलदीपचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम : पूर्वी हृदयविकारासारखे आजार फक्त वृद्धांमध्ये दिसायचे. मात्र आता बदलत्या जीवनशैलीमुळे हा आजार हळूहळू तरुणांमध्येही पसरतोय. गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. येथे पहिली मध्ये शिकणाऱ्या 6 वर्षीय बालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. 'मायोकार्डिटिस' हे त्याच्या मृत्यूचं कारण होतं. या आजारामध्ये हृदयाचं पंपिंग क्षीण होतं.

हे वाचलंत का :

  1. टाटा मॅरेथॉनदरम्यान 75 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू
  2. चिंताजनक; पहिलीतल्या मुलाचा हार्ट अटॅकनं मृत्यू, हल्ली लहान मुलांच्यातही वाढतोय हृदयविकार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.