हैदराबाद Benefits Of Walking : चालणं ही सुदृढ शरीराची गुरुकिल्ली आहे. पूर्वी प्रत्येकजण शारीरिक श्रम करत असत, परंतु सध्यस्थिती काही वेगळी आहे. बसून काम करण्याचं प्रमाण फार वाढत आहे. परिणामी आरोग्यविषयक अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. म्हणून प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे. परंतु व्यग्रतेच्या जीवनात व्यायाम करणं शक्य नसल्यास किमान काही पावलं चालणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया वयानुसार दररोज किती चालायला हवं.
तज्ञांचे मत : एंडोक्राइनोलॉजिस्टच्या मते प्रत्येक व्यक्तीनं (प्रौढ) दररोज किमान 10,000 पावलं चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे हृदय मजबूत होतं. हृदयविकार टाळण्यासाठी तर प्रत्येकानं चालणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नियमित चालण्यास सुरुवात केली तर मधुमेह, ब्रेन स्ट्रोक, लठ्ठपणा, स्तनाचा कर्करोग आणि नैराश्य यासारखे भयावह आजारापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. तसंच चालण्यानं हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि कॅलरी बर्न होण्यासही मदत होते. याशिवाय चालण्यानं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
अभ्यासानुसार रोज किती पावलं चालणं गरजेचं आहे - दरोराज किमान 10,000 पावलं चालणं गरजेचं आहे. म्हणजेच किलोमीटरमध्ये सांगायचं झाल्यास निरोगी आयुष्यासाठी 7.5 किलोमीटर चालणं बंधनकारक आहे. कित्येकांना सात किलोमीटर ऐकूण धक्का बसला असेल परंतु याचा अर्थ सतत चालत राहणं असं नाहीये. झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण हा पल्ला गाठला पाहिजे. तज्ञांच्या मते, जर तुम्ही सकाळी एक तास चाललात तर तुम्ही तुमचं चालण्याचं टार्गेट पूर्ण करू शकता. याव्यतिरिक्त नियमित किमान दीड तास खेळ खेळू शकता. यामुळे तुम्ही निरोगी तर राहताच शिवाय शरीरही मजबूत होतं.
वयानुसार किती चालावं?
40 वर्षांखालील महिला - दररोज 12,000 पावलं चालण्याची शिफारस केली जाते.
40 ते 50 वयोगटातील महिला - दररोज 11,000 पावलं चालण्याचं लक्ष्य ठेवावं.
50 ते 60 वयोगटातील महिला - दररोज 10,000 पावलं चालल्यास पूर्णपणे निरोगी राहू शकतात.
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी 8,000 पावलांचं लक्ष्य ठेवलं पाहिजे.
पुरुषांसाठी, 18 ते 50 वयोगटात दररोज 12,000 पावलं उचलण्याची शिफारस केली जाते.
50 पेक्षा जास्त वयाचे पुरुष - दररोज 11,000 पावलं चालण्याचं लक्ष्य ठेवावं.
यापूर्वी या विषयावर अनेक संशोधनं झाली आहेत. त्यानुसार एका व्यक्तीनं एका दिवसात किमान 4,000 ते 5,000 पावलं चालणं बंधनकारक आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या पेड्रो एफ गार्सिया यांनी 2023 मध्ये केलेल्या अभ्यासात असा, निष्कर्ष काढला की किमान 4,000 पावलं चालणं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी गरजेचं आहे.
चालण्याचे फायदे
- नियमित चालल्यामुळे पचनक्रिया सुधारते.
- स्थायू बळकट होतात.
- मधुमेह नियंत्रित राहतो.
- शरीरात फॅट साचत नाही
- मानसिक आरोग्य सुधारते.
- स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
हेही वाचा
- वयानुसार तुम्ही किती तास झोपले पाहिजे तपशील येथे जाणून घ्या... - benefits of sleep
- मान्सूनच्या हंगामात त्वचेला चमकदार बनवण्यासाठी करा 'या' गोष्टी - skincare tips
टीप: येथे तुम्हाला दिलेली सर्व आरोग्य माहिती आणि सूचना केवळ तुमच्या माहितीकरिता आहेत. आम्ही ही माहिती वैज्ञानिक संशोधन, अभ्यास, वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिक सल्ल्यांवर आधारित देत आहोत. परंतु, त्यांचे पालन करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.