हैदराबाद world translation day 2024 - यंदा आंतरराष्ट्रीय अनुवाद दिनाची “अनुवाद, संरक्षण करण्यायोग्य कला” अशी संकल्पना आहे. भाषांतर एक कला आहे. भाषांतराचे संरक्षण करण्यासाठी, कॉपीराइट आणि संबंधित अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी आणि उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठीव्यवसायाचे भविष्य आणि टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी ही संकल्पना आहे.
भाषा ही पृथ्वीसह लोकांची ओळख, संवाद आणि सामाजिक अभिसरण, शिक्षण आणि विकासाचा महत्त्वाचा घटक आहे. विकास, सांस्कृतिक वैविध्यता आणि बौद्धिक संपदामधील संवाद याकरिता भाषा महत्त्वाची भूमिका बजाविते. याबाबत अधिक जागरुकता वाढत आहे. भाषा ही सर्वांसाठी चांगले शिक्षण आणि बौद्धिक समाजात समावेशकता वाढविणं, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठीदेखील महत्तवाची ठरते. लोकांमध्ये एकतेची भावना वाढीला लागण्याकरिता भाषेचं वैविध्य जपण्याचा संयुक्तर राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक सभेकडून आग्रह करण्यात येतो. बहुभाषेचं वैविध्य जपल्यांना अनेकांना संस्थात्मक कामात भाग घेता येतो. तसेच अत्यंत परिणामकारक काम आणि पारदर्शकतेत भर पडण्याकरिता मदत होते.
- संयुक्त राष्ट्रसंघात अनुवादाचं काम कसे चालते?व्यावसायिक अनुवादक कर्मचाऱ्यांचं सर्वाधिक प्रमाण असलेली असलेली जगातील सर्वोत मोठी संस्था म्हणजे संयुक्त आहे. शेकडो अनुवादक न्यूयॉर्क, जीनिव्हा, व्हिएन्ना आणि नैरोबीमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात काम करतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रादेशिक कार्यालयातदेखील अनुवादक कार्यरत असतात.
अनुवादकांसाठी सर्वात जास्त पैसे मिळवून देणाऱ्या भाषा -अनुवादकांना उच्च वेतन मिळवून देणाऱ्या जगात 10 भाषा आहेत. त्यामधून काम करणाऱ्याला प्रति वर्ष 50,000 हजार डॉलरहून अधिक जास्त पैसे मिळतात. तुमचे कौशल्य अनुभव आणि पात्रतेनुसार हे वेतन बदलू शकते. भारतातील भाषा अनुवादकाला सरासरी वेतन वार्षिक 550,000 मिळते. तसेच तासाला 220 रुपये मिळते. सुरुवातीला प्रति वर्ष 2, 46,000 रुपयापासून पुढे मिळते.
- जर्मन:- आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याकरिता स्वारस्य असलेल्या जर्मन अनुवादकांना नोकरी मिळवण्याच्या भरपूर संधी आहेत. या पदासाठी सरासरी पगार प्रति वर्ष 53,588 डॉलर आहे.
- मँडरियन:-जगातील सर्वात वेगाने वाढणारी भाषा म्हणून मँडरिन ही एक उत्कृष्ट निवड आहे. एक अनुवादक वर्षाला 73,156 डॉलर कमावितो.
- अरबी:- अनेक स्टार्टअप्स, कंपन्या आणि गुंतवणूकदार व्यावसायिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी अरबी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमधील अनुवादक शोधत असतात. या भाषेमधील अनुवादक दरवर्षी 71,957 डॉलर कमावतात.
- फ्रेंच:-पर्यटनासह शैक्षणिक क्षेत्रातील व्यावसायिकांना फ्रेंच शिकण्याचा फायदा होऊ शकतो. या पदासाठी सरासरी आधार वेतन 81,540 डॉलर प्रति वर्ष मिळू शकते.
- जपानी:- बरेच लोक जपानी भाषा शिकण्यास सोपी भाषा मानतात. तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वाची भाषा मानतात. जपानीमधील अनुवादक दरवर्षी 54,324 डॉलर कमावतात.
- हिंदी:-हिंदी ही सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या विदेशी भाषांपैकी एक आहे. हिंदीत प्रति वर्ष 96,539 डॉलर कमविता येतात.
- स्पॅनिश:-स्पॅनिश ही जगात अत्यंत लोकप्रिय आहे. या भाषेमुळे तुमची कमाई क्षमता वाढविण्यात मदत होऊ शकते.
- इटालियन:-कायदा, आरोग्यसेवा आणि वित्त या क्षेत्रातील करिअरच्या संधी सुधारण्याकरिता इटालियन चांगली भाषा आहे. प्रति वर्ष सरासरी पगार 57,631 डॉलर मिळू शकतो.
- रशियन:-वित्त, व्यवसाय आणि व्यापार उद्योगांमध्ये रशियन अनुवादकांना जास्त मागणी आहे. राजकारण आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये करिअर शोधण्यात स्वारस्य असलेल्या व्यक्तींसाठी ही एक महत्त्वाची भाषा आहे. अमेरिकेची प्रतिनिधी प्रति वर्ष सरासरी 89,619 डॉलर कमावतात.
- पोर्तुगीज:-इंग्रजीनंतर सर्वात वेगाने वाढणारी भाषा म्हणजे पोर्तुगीज आहे. व्यवसाय आणि विज्ञानातील अनेक व्यावसायिकांसाठी पोर्तुगीज ही महत्त्वाची भाषा आहे.
मशिन ट्रान्सलेशनचा अनुवादकांवर काय झाला परिणाम?गुगल ट्रान्सलेशन, डीपएल ट्रान्सलेटर, आय ट्रान्सलेट, अॅमेझॉन ट्रान्सलेट, मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेट, सिस्ट्रॅन ट्रान्सलेट या सॉफ्टवेअरकडून अनुवाद करण्यात येतो. अलिकडच्या वर्षांत मशीन भाषांतर तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यानं अनुवादकांच्या कामावर निश्चितपणे परिणाम झाला आहे. मशिन भाषांतर प्रणालींमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असली तरी, त्यात अजूनही अचूकता आलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता असलेले भाषांतरे तयार करण्यासाठी कुशल मानवी अनुवादकांची अजूनही कंपन्यांमध्ये गरज आहे. यूएस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सच्या मते, अनुवाद व्यवसायातील रोजगार 2029 पर्यंत 20% वाढण्याची अपेक्षा आहे.
कशामुळे अनुवादकांची वाढली मागणी?भारतातील डिजिटल क्रांतीमुळे भारतातील अनेकांना त्यांच्या प्रादेशिक भाषांमधील सामग्री वाचायची आहे. जवळपास 90% इंटरनेट वापरकर्ते ऑनलाइन खरेदी करण्यापूर्वी त्यांची प्रादेशक भाषा वापरण्यास प्राधान्य देतात. उत्पादनाच्या लेबलांवरही प्रादेशिक भाषांमध्ये सूचना लिहिलेल्या असतात. एआय क्षेत्रातदेखील संधी वाढल्या आहेत. भाषा अनुवादक बनण्यासाठी प्रादेशिक भाषेतील पदवी किंवा डिप्लोमा तसेच सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग किंवा माहिती तंत्रज्ञानाची पात्रता आवश्यक असते.
विदेशी भाषा अभ्यासक्रम शिकविणारी आघाडीचे विद्यापीठ
- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ
- बनारस हिंदू विद्यापीठ
- जामिया मिलिया इस्लामिया
- मुंबई विद्यापीठ
- दिल्ली विद्यापीठ
- अहमदाबाद विद्यापीठ
अनुवादकांसाठी या ठिकाणी मिळू शकतात रोजगाराच्या संधी
- वर्तमानपत्रे आणि मासिके
- तांत्रिक, वैज्ञानिक साहित्य किंवा व्यवसाय
- शैक्षणिक संस्था
- रुग्णालये आणि दवाखाने
- पर्यटन क्षेत्र
- हॉस्पिलिटी उद्योग
- प्रदर्शने आणि मेळे
- एअरलाइन कार्यालये
- निर्यात एजन्सी
- व्यापार संघटना
- प्रकाशन संस्था
- कोर्टरूम्स
- आंतरराष्ट्रीय संस्था
- दूतावास
- शिक्षण संस्था